राष्ट्रवादीची वेंगुर्लेत महागाई विरूध्द निदर्शने

राष्ट्रवादीची वेंगुर्लेत महागाई विरूध्द निदर्शने

वेंगुर्ले - सतत वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या आणि एकूणच महागाईच्या विरोधात आज तालुका राष्ट्रवादीने टाळ, मृदूंगाच्या गजरात निदर्शने केली. यावेळी जिल्ह्यात महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचारांचाही निषेध करण्यात आला. तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन झाले.

तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते एम के गावडे यांच्या नेतृत्वाखाली या दरवाढीच्या विरोधात तहसील कार्यालया समोर मृदंग, टाळ वाजवत देवेंद्रा अजब तुझे सरकार, या सरकारच कारायचं काय - खाली डोके वर पाय अशी भजने म्हणत भाजप शिवसेना युतीचा निषेध करण्यात आला.

यावेळी महिला जिल्हाध्यक्षा कुबल, तालुकाध्यक्ष सत्यवान साटेलकर, कॉंग्रेसच्या पंचायत समिती सदस्य साक्षी कुबल, मठ सरपंच दादा ठाकूर, माजी नगरसेवक वामन कांबळी, सरोज परब, आरवली माजी सरपंच धर्मजी बागकर, जिल्हा बॅंक माजी संचालक नितीन कुबल, योगेश कुबल, पराग सावंत, एकनाथ जाधव, अर्जुन परब, यांच्याशीत राष्ट्रवादी चे कार्यकर्ते उपस्थित होते. 

गेल्या तीन वर्षांमध्ये पेट्रोल, डिझेल व गॅस च्या दरवाढीमुळे विविध वस्तूंचे भावही वाढत आहे. याचा सामान्य माणसांचे अर्थकारण बिघडले आहे. जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या या सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात इयत्ता सहावीत शिकणारी मुलगीही सुरक्षीत राहिली नाही. त्यामुळे या सर्वाचा विचार करता सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आशा आशयाचे निवेदन यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदार शरद गोसावी याना देऊन सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी या आंदोलनाला पोलोस निरीक्षक शशिकांत खोत यांनी भेट देऊन चर्चा केली.

त्या शिक्षकाच्या निलंबनाची मागणी
यावेळी तालुक्‍यात सहावीत शिकणाऱ्या मुलीवर त्याच शाळेतील एका शिक्षकाने अश्‍लील वर्तवणूक केली. या प्रकारचा राष्ट्रवादीच्या वतीने यावेळी निषेध करण्यात आला. त्याला निलंबित करण्याची मागणीही करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com