सावंतवाडी विधानसभेची जागा राष्ट्रवादी लढवणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

वेंगुर्ले - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले-सावंतवाडी-दोडामार्ग हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस निश्‍चितपणे लढवणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच मित्रपक्षांच्या सहकार्याने या मतदार संघात निवडणूक लढविणार असल्याची माहिती पक्षाचे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

वेंगुर्ले - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले-सावंतवाडी-दोडामार्ग हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस निश्‍चितपणे लढवणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच मित्रपक्षांच्या सहकार्याने या मतदार संघात निवडणूक लढविणार असल्याची माहिती पक्षाचे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. गावडे म्हणाले, ""सत्ताधाऱ्यांनी या मतदार संघात गेल्या 5 वर्षात दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. लोकांची दिशाभुल करण्यासाठी केवळ आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्या परंतू त्याची पुर्तता न करणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना लोक कंटाळले आहेत. लोकसभेच्या निवडणूकीप्रमाणे विधानसभेची निवडणूक केवळ मोदींच्या नावावर चालणार नाही. कोकणातील जनता सुज्ञ आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात काहीच केलेले नाही ही बाजूच आम्ही पक्षाच्या माध्यमातून तळागळातील सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहचवणार आहोत.'' 

या पत्रकार परिषदेवेळी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, माजी जिल्हा बॅंक संचालक नितिन कुबल उपस्थित होते.

श्री. गावडे पुढे म्हणाले, "कॉंग्रेसच्या अनेक वर्षांच्या राजवटीत जे झाले नाही ते आम्ही पाच वर्षात करु असे आश्वासन या सत्ताधाऱ्यांनी दिले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणार, दोन कोटी युवकांना नोकऱ्या देणार, डिझेल-पेट्रोलचे भाव कमी करणार अशा एक ना अनेक घोषणा केल्या; मात्र एकही घोषणा पूर्ण करु शकले नाहीत. उलट गॅस दरवाढ, वीज बिल डबल, शासनाचे उत्पन्न वाढवण्याच्या नावावर जमिनीचे दर अनेक पटीने वाढले त्याचे परिणाम दराच्या पटीत शेतकऱ्याकडून शेतसाऱ्यांची वसुली केली जात आहे.'' 

72 हजार नोकऱ्या उपलब्ध केल्याची घोषणा सरकारने केली पण आपल्या जिल्ह्यातील सात लोकांनाही नोकरी मिळाली नाही हे दुदैव. या सरकारच्या कर्ज माफीच्या नावाखाली वसुली होत नसल्याने बॅंका अडचणीत आल्या आहेत. कर्ज फेड नसल्याने नविन कर्ज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्याची आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर आहे. सामान्य जनता महागाईच्या विळख्यात सापडली आहे. रेशनवर धान्य पुरावढा कमी केला, परंतू ते धान्यही खाण्यायोग्य नसते हे दुर्भाग्य आहे. त्यामुळे या वास्तवाची माहिती तळागळातील जनतेपर्यंत आम्ही राष्ट्रवादीतर्फे पोहचवणार आहोत. म्हणूनच सत्ताधाऱ्यांचा पराभव अटळ असल्याचेही श्री. गावडे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP will fight Sawantwadi Assembly Constituency