रिक्षा स्टॅन्डजवळच उच्चदाबाचे विद्यूत रोहित्र उघडे

अमित गवळे
रविवार, 13 मे 2018

पाली हे अष्टविनायक देवस्थानांपैकी एक धार्मीक स्थळ आहे. मोठ्या प्रमाणात भाविक पालीला येत असतात. तसेच पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे शासकीय कामांसाठी व बाजारात बाजुच्या गावांतील ग्रामस्त मोठ्या प्रमाणात येतात. येथील शाळेत व महाविदयालायात देखिल बाजुच्या गावांमधून विदयार्थी येतात. अनेकजण मिनिडोअर रिक्षाने प्रवास करतात. मिनिडोअर रिक्षास्टॅन्डलगतच हॉटेल, उपहारगृह, शितपेयाच्या दुकानासह विविध प्रकारची दुकाने आहेत. त्यामुळे येथे नागरिकांची सतत रेलचल सुरु असते. 

पाली (रायगड) - येथिल रिक्षा स्टॅन्डजवळील उच्चदाबाचे विद्युत रोहित्र उघडे आहे. त्यामुळे प्रवाशी, भाविक, चालक व नागरीकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. हे विद्युत रोहित्र सुरक्षित करावे किंवा दुसऱ्या ठिकाणी बसवावे अशी मागणी मिनिडोअर रिक्षा चालक-मालक संघटनेने केली आहे. 

पाली हे अष्टविनायक देवस्थानांपैकी एक धार्मीक स्थळ आहे. मोठ्या प्रमाणात भाविक पालीला येत असतात. तसेच पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे शासकीय कामांसाठी व बाजारात बाजुच्या गावांतील ग्रामस्त मोठ्या प्रमाणात येतात. येथील शाळेत व महाविदयालायात देखिल बाजुच्या गावांमधून विदयार्थी येतात. अनेकजण मिनिडोअर रिक्षाने प्रवास करतात. मिनिडोअर रिक्षास्टॅन्डलगतच हॉटेल, उपहारगृह, शितपेयाच्या दुकानासह विविध प्रकारची दुकाने आहेत. त्यामुळे येथे नागरिकांची सतत रेलचल सुरु असते. 

विद्युत विजवितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याने धोका निर्माण झाला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने वेळीच उपाययोजना करा, अन्यथा भविष्यात याठिकाणी कोणताही अपघात घडल्यास त्या घटनेस विजवितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना जबाबदार धरले जाईल असा इशारा मिनिडोअर चालक मालक संघटना पालीचे अध्यक्ष मंगेश भगत यांनी दिला आहे. यावेळी उपाध्यक्ष राकेश मढवी, सुरेश आंग्रे, अस्लाम महाडकर, प्रदिप देशमुख, प्रेमकांत खाडे, अमित पानसरे, राजेश पिंपळे आदी उपस्थित होते.

Web Title: near Rickshaw Stand power tranformer is open in pali