देशाच्या स्वातंत्र्यदिनी लावलेल्या झाडाला फ्लेक्सचा विळखा

अच्युत पाटील
बुधवार, 20 जून 2018

बोर्डी - देशाच्या स्वातंत्र्यदिनाची आठवण म्हणून घोलवड ग्रामपंचायत क्षेत्रात चावडीनाका तीन रस्त्यावर लावलेल्या झाडावर जाहिरात बाजीचा विळखा पडला आहे. ग्रामपंचायत तसेच पर्यावरण प्रेमी या विषयात गांभीर्याने लक्ष्य घालतील काय? असा प्रश्न यामुळे ग्रामस्थांना पडला आहे.

स्वातंत्र्य लढ्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वामन रामचंद्र अमृते यांनी देशाच्या स्वातंत्रदिनाची आठवण म्हणून 15 ऑगस्ट 1947 रोजी घोलवड चावडीनाका येथे तीन रस्त्यावर कडुलिंबाचे रोपटे लावले. एवढ्या वर्षात त्याचा मोठावृक्ष झाला आहे. ग्रामपंचायतीने झाडाच्या सभोवती पार बांधल्याने वाटसरूंसाठी बसण्याची येथे उत्तम सोय झाली आहे.  परंतु, काही जाहिरातदारांनी या झाडावर कब्जाच केला आहे. वेगवेगळ्या जाहिरातिचे बॅनर खिळेमारून लावल्याने झाडाचा श्वास कोंडला आहे. 

या झाडाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी त्वरित निर्णय घऊन, अशा प्रकारे जाहिरातबाजी करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. 

Web Title: need to remove flakes around the tree