esakal | रत्नागिरीकरांची चिंता वाढली ; कोरोना रूग्णांची संख्या पाच हजारच्या घरात
sakal

बोलून बातमी शोधा

new 106 corona patient in ratnagiri

जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

रत्नागिरीकरांची चिंता वाढली ; कोरोना रूग्णांची संख्या पाच हजारच्या घरात

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी - जिल्ह्यात आज आणखी 106 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या 4 हजार 961 झाली आहे. दिवसभरात चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याने मृतांचा आकडा 149 झाला आहे. मृत्यूदरातही काहीशी वाढ झाली आहे. एकूण कोरोनामुक्त झालेले 42 रुग्ण आहेत. रत्नागिरी तालुक्यातील एका खासगी कंपनीच्या बड्या अधिकार्‍याचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये आरटीपीसीआरमध्ये एकूण 80 रुग्ण तर अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 26 रुग्ण पॉझिटिव्ह आले. सर्वाधिक रुग्ण चिपळूण तालुक्यात 25 इतके आहेत. खेड- 23, गुहागर- 8, संगमेश्‍वर- 18, रत्नागिरी- 22, लांजा- 10 रुग्णांचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यात निवखोल- 1, के.सी. जैननगर- 1, जुनी तांबटआळी- 1, गोळप- 1, मारुती मंदिर- 2, मालगुंड- 1, सन्मित्रनगर, फिनॉलेक्स कॉलनी- 2, टिळक आळी- 1, गडनरळ- 1, संगमेश्वर- 1, सावर्डे- 1, जे. के. फाईल्स 1 आणि गोविंद अपार्टमेंट 1 असे नव्याने रुग्ण सापडले आहेत. जयगड परिसरातील एका खासगी कंपनीतील अधिकारी, कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. अधिकार्‍यांना अधिक उपचारासाठी परजिल्ह्यामध्ये दाखल केले आहे. त्यातील एका प्रमुख अधिकार्‍याचा आज मृत्यू झाला. 

जिल्ह्यात दिवसभरात चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चिपळुणातील 41 वर्षीय तरुणासह 84 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. तसेच खेड येथील 65 वर्षीय आणि संगमेश्‍वर येथील 80 वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 149 झाली आहे. घसरलेला मृत्यूचा दर पुन्हा 3 टक्क्यावर आला आहे. आज एकूण 42 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामध्ये दापोली येथील 18, रत्नागिरी सामाजिक न्याय भवन- 2, खेड-घरडा- 2, पेढांबे- 2, महिला रुग्णालय- 7, दापोली हेल्थ सेंटर- 1, संगमेश्‍वर-देवरूख कॉलेजमधील 10 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत  3 हजार 060 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. 811 रुग्ण विविध रुग्णालयात तर 159 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

हे पण वाचारत्नागिरीची कन्या अभिनेत्री अक्षता भोळेची आंतरराष्ट्रीय भरारी 

एकूण बाधित रुग्ण  - 4961

एकूण निगेटिव्ह       -25882

आजचे निगेटिव्ह       -524

 एकूण मृत             -149
 बरे झालेले            -3060

 दाखल रुग्ण          -811

संपादन - धनाजी सुर्वे 
 

loading image