esakal | दिलासादायक बातमी ; रत्नागिरीत आज कोरोना बाधितांची निचांकी नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

new 44 corona patients in ratnagiri

जिल्हा आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 44 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

दिलासादायक बातमी ; रत्नागिरीत आज कोरोना बाधितांची निचांकी नोंद

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी - जिल्ह्यात गेल्या महिन्याभरातील कोरोना रूग्णांची निचांकी नोंद शनिवारी झाली असून अवघे 44 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. एकूण बाधितांचा आकडा 7,114 झाला आहे; मात्र मृतांच्या नोंदीत पाच रुग्णांची भर पडली आहे. त्यातील एक रुग्ण आठ दिवसांपूर्वी मृत पावलेला आहे. उर्वरित मागील दोन दिवसातील आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा 245 वर पोचला असून मृत्यूदर 3.40 टक्केवर स्थिर राहीला आहे.


जिल्हा आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 44 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यात 7 आरटीपीसीआरमधील तर 37 अँटिजेन टेस्टमधील आहेत. मंडणगड, दापोली, खेड तालुक्यात एकही रुग्ण सापडलेला नाही. गुहागर 2, चिपळूण 14, संगमेश्वर 1, रत्नागिरी 22, लांजा 2 आणि राजापूर तालुक्यात 3 रुग्ण सापडले आहेत. 19 ते 26 सप्टेंबर या कालावधीत मृत पावलेल्या पाच रुग्णांची नोंद आज झाली. त्यात शनिवारी (ता. 26) मृत पावलेले 2 रुग्ण तर शुक्रवारी (ता. 25) मृत पावलेले दोन रुग्ण आहेत. ते सर्व रत्नागिरी, दापोली, चिपळूण आणि लांजा तालुक्यातील आहेत.

हे पण वाचासभापती हजवानी यांचा राजीनामा मागे; राष्ट्रवादीला सोडून शिवसेनेशी सोयरीक

जिल्ह्यात आतापर्यंत 245 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृत्यूदर पुन्हा 3.40 टक्केवर आला आहे. हा दर कमी करण्यासाठी शासनाने माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम हाती घेतली आहे. ताप, सर्दी, खोकला असे आजार असलेल्यांवर त्वरीत उपचार व्हावेत यासाठी आरोग्य पथके गावपातळीवर उतरलेली आहेत. परिणामी येत्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण आणि मृत्यू दर खाली येईल असा आरोग्य विभागाचा दावा आहे.

हे पण वाचा आरटीओतील एजंटगिरीला लागणार चाप 


संपादन - धनाजी सुर्वे 
 

loading image
go to top