esakal | रत्नागिरीत कोरोनाचे नवे ८१  रूग्ण ; दिवसात सात बाधितांचा मृत्यू  
sakal

बोलून बातमी शोधा

new 81 corona cases in ratnagiri district

रत्नागिरीमध्ये 37 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. पोलिस मुख्यालयामधील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे.

रत्नागिरीत कोरोनाचे नवे ८१  रूग्ण ; दिवसात सात बाधितांचा मृत्यू  

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी - जिल्ह्यात गेल्या चोविस तासात कोरोना बाधितांची संख्या घटली असली तरी एका दिवसात 7 जणांचा मृत्यू ही चिंता वाढविणारी बाब आहे. आज नव्याने 81 बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 6 हजार 066 वर पोहचली आहे. सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत. तर 152 लोकांनी आज कोरोनावर मात केली. 

जिल्ह्यात काल विक्रमी 222 कोरोना बाधित रुग्ण सापडले. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाची चिंता वाढली होती. मात्र आज बाधितांची संख्या घटल्याने काहीसा दिलासा मिळाला. 

आतापर्यंत 6 हजारावर कोरोना बाधित आहेत. आजच्या अहवालामध्ये 61 आरटीपीसीआर चाचणी तर 20 अ‍ॅन्टीजेन चाचणीतील बाधित आहेत. मंडणगड, संगमेश्‍वर तालुक्यात एकही रुग्ण नाही. दापोली 3, खेड 12, गुहागर 7, चिपळूण 10, रत्नागिरी 37, लांजा 3, राजापूर 9 रुग्ण आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये मृतांचा आकडा वाढत आहे. काल आणि आज दोन दिवसात 7 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 2, लांजा 1, चिपळूण तालुक्यातील 4 मृतांचा समावेश असल्याने मृतांचा आकडा पावणे दोनशेवर पोचला 
आहे. 

रत्नागिरीमध्ये 37 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. पोलिस मुख्यालयामधील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. शहर आणि परिसर कोरोनाचे हॉट स्पॉट बनले आहेत. झरेवाडी 2, खंडाळा, जयगड प्रत्येकी 1, नावडी 1, तळेकांटे 1, पांढरा समुद्र 2, शिरगाव 2, रेल्वे कॉलनी 1, फाटक हायस्कुल 1, जोशी पाळंद 1, मुरूगवाडा, शिवाजी नगर, आंबेशेत प्रत्येकी 1, मिरजोळे, रामआळी, गावखडी, पावस, झाडगाव, तेलीआळी, निवखोल, केळ्ये गावात प्रत्येकी 1 रुग्ण सापडला. कोरोनावर मात करणार्‍यांची संख्याही समाधानकारक आहे. गेल्या 24 तासात 152 जणांना मुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या 3 हजार 744 आहे. यात दापोली केकेवी 61, गुहागर 12, सामाजीक न्याय भवन 17, लांजा 23, खेड 14, पेढांबे 9, रत्नागिरी सिव्हिल 4, संगमेश्‍वर 6 रुग्ण आहेत. 

हे पण वाचापाच लाखांसाठी सासरच्यांनी छळल्याने विवाहितेने दिला जीव

 एकूण पॉझिटिव्ह - 6,066

बरे झालेले   - 3,744

 एकूण मृत्यू  - 175

 उपचाराखालील - 123

 होम आयसोलेशन - 420

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image