राजापूरातील सायबाशेजारी नवे काम

New Dam Work Near Rajapur Sayba Dam Radtnagiri News
New Dam Work Near Rajapur Sayba Dam Radtnagiri News

राजापूर - गेली 140 वर्ष राजापूरकरांची तहान भागविणाऱ्या कोदवली येथील सायबाचे धरण नादुरूस्त झाले. त्याठिकाणी ढासळलेल्या भिंतीतून मोठ्याप्रमाणात पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे सायबाचे धरण परिसरामध्ये नवीन धरण बांधण्यात येत आहे. पुढील महिन्यामध्ये प्रत्यक्षात त्याच्या कामाला सुरूवात होणार आहे. 

विधान परिषदेच्या आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या विशेष प्रयत्नांनी 10 कोटी रूपये निधीतून सायबाचे धरण परिसरामध्ये नवीन धरण मंजूर झाले. या धरणाचा आराखडा तांत्रिक मंजुरीसाठी शासन स्तरावर पाठविण्यात आला असून त्याला मंजुरी मिळून पुढील महिन्यामध्ये प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांनी दिली. 

शहराला सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठ्यासाठी ब्रिटिशांनी कोदवली येथे 1878 मध्ये सायबाचे धरण बांधले. या धरणाच्या भिंतीची 25 मीटर लांबी असून पायाशी तीन मीटर रूंदी आहे. येथून सायफनने कोणताही खर्च न करता शहराला पाणीपुरवठा केला जातो. गेल्या 140 वर्षामध्ये शहराची लोकसंख्या वाढली, कमालीचा विकास, विस्तार झाला. मात्र, शहराला पाणीपुरवठ्याचा मूख्य जलस्रोत कायम राहीला आहे.

अधिवेशनात तारांकित प्रश्न 

धरणाच्या भितींची फारशी न झालेली डागडूजी, गाळाचा संचय आदींमुळे अपेक्षित पाणीसाठा होत नाही. कोदवली नदीच्या पाण्याच्या तीव्र उताराच्या प्रवाहामुळे धरण फुटून शहरामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची भिती वर्तविली जात आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर आमदार खलिफे यांनी दोन वर्षापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. धरणाला लागलेली गळती, आवश्‍यक असलेली दुरूस्ती आणि पाण्याचा प्रवाहाचा असलेला संभाव्य धोका लक्षात घेवून या ठिकाणी नवीन धरण बांधावे अशी मागणी त्यांनी केली होती. स्ट्रक्‍चरल ऑडीटमध्ये धरणाची स्थिती धोकादायक असल्याचे चित्र पुढे आले होते. त्याची दखल घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नवीन धरणासाठी दहा कोटींचा निधी मंजूर केला. त्यातून, हे नवीन धरण बांधण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष ऍड. खलिफे यांनी स्पष्ट केले. 

तांत्रिक मंजूरीसाठी शासनाकडे 

या धरणाची लांबी 135 मीटर, 15 मीटर उंची आहे. त्यामध्ये सुमारे 2.4 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा अपेक्षित आहे. नव्या धरणाचा प्रस्ताव तांत्रिक मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. येत्या काही दिवसांमध्ये त्याला मंजूरी, त्यानंतर निविदा प्रक्रीयाही पूर्ण होवून पुढील महिन्यात प्रत्यक्षात कामाला सुरूवात होण्याचा विश्‍वास खलिफे यांनी व्यक्त केला. 

आणखी वाचा - 

दोडामार्ग तालुका गोव्यामध्ये विलिन करण्याच्या मागणी मागे आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com