
आज सापडलेल्या 9 कोरोना रुग्णांमध्ये आरटीपीसीआर 5 तर ऍन्टीजेन चाचणीत 4 रुग्ण अशी कोरोना रुग्णांची संख्या 9 झाली आहे.
रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोना चाचण्यांमध्ये गेल्या 24 तासात 9 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या 9 हजार 442 झाली आहे. 6 जणांनी कोरोनावर मात केली असून 245 रुग्ण निगेटिव्ह सापडले आहेत. आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 342 झाली आहे.
आज सापडलेल्या 9 कोरोना रुग्णांमध्ये आरटीपीसीआर 5 तर ऍन्टीजेन चाचणीत 4 रुग्ण अशी कोरोना रुग्णांची संख्या 9 झाली आहे. त्यामध्ये चिपळूण 4, लांजा 1, रत्नागिरी 3, दापोली 1. उर्वरित तालुक्यांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. गेल्या 24 तासात झालेल्या चाचण्यांमध्ये 245 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजवर 64 हजार 742 स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दिवसभरात 6 रुग्ण बरे झाले असून एकूण 8 हजार 991 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.22 टक्के आहे.