आता शिवग्रामीण टॅक्‍सीचा नवा पर्याय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

ग्रामीण भागासाठी मान्यता - चारचाकी ७०० सीसीची गाडी

कणकवली - गावागावांतील प्रवाशांच्या सुख-दुःखात सहभागी असलेल्या तीनआसनी रिक्षाला सहाआसनीनंतर आता चारचाकी शिवग्रामीण टॅक्‍सीचा पर्याय येणार आहे. राज्याच्या परिवहन विभागाने मान्यता दिल्याने आता तीनआसनी रिक्षांना पर्याय म्हणून शिवग्रामीण टॅक्‍सी योजना अमलात आली आहे. 

हवेतील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी रोखण्यासाठी परिवहन विभाग अनेक उपाययोजना करीत आहे. शहरी भागातील या समस्या जटिल असल्याने असे पर्याय पुढे येत आहेत; परंतु ग्रामीण भागात सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी सुरक्षित वाहन म्हणून शिवग्रामीण टॅक्‍सी हा पर्याय पुढे आला आहे. या टॅक्‍सीचा रंग नारंगी व पांढरा असणार आहे. 

सध्या तीन आणि सहाआसनी रिक्षांच्या बदल्यात ७०० सीसी इंजिन क्षमता असलेली ही चारचाकी सहाआसनी टॅक्‍सी असणार आहे. तीनचाकी रिक्षा बाद झाल्यामुळे अशा चालकाला ७०० सीसी इंजिन क्षमता असलेली शिवग्रामीण टॅक्‍सी वापरण्याची परवानगी दिली जाणार आहे. यात महिलांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून ५ टक्के आरक्षण आहे.

Web Title: new option shivgramin taxi