शाश्‍वत पर्यटन विकासासाठी जिल्ह्यात नवी योजना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात पर्यटन वृद्धी आणि स्थानिकांना रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून शाश्‍वत पर्यटन विकसित करण्याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन शिर्षकाखाली तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यात सागर किनारे भागातील अविकसित, कमी विकसित स्थळाचा समावेश करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी शासनातर्फे भागीदारी संस्था म्हणून जिल्हा परिषद कार्यान्वयीन यंत्रणा ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ही योजना स्थानिक इच्छुक नागरिक आणि शासन यांच्या एकत्रित भागीदारीतून राबविण्यात येणार असून आर्थिक गुंतवणूक ही लाभार्थ्यांच्या जागेवर कॉटेज, तंबू, तत्सम निवासी संकुलासाठी तात्पुरता आराखडा उभारणीच्या माध्यमातून होईल. शासनातर्फे आर्थिक गुंतवणुकीची जबाबदारी आणि स्थानिक नागरिकांकडून जागा उपलब्धता आणि व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली गेल्यास निश्‍चितच दोन्ही बाजूंना फायदेशीर आणि स्थानिक पर्यटक विकासाला पोषक, अशी वातावरण निर्मिती होऊ शकेल आणि पर्यटनवृद्धीला चालना मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे. याबाबतची विस्तृत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

इच्छुकांनी या योजनेत सहभागासाठी त्यांचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्याकडे ६ ते २१ जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. प्राप्त झालेल्या प्रस्तावधारकांची एकत्रित बैठक घेऊन संपूर्ण योजनेची सविस्तर माहिती देण्यात येईल. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अंतिमतः निर्णय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हास्तरीय पर्यटन विकास समितीस असतील. या योजनेत सिंधुदुर्गातील इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चौधरी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी केले.

Web Title: New plan for the development of sustainable tourism district