esakal | सिंधूदुर्गात कोरोनाचे नवे निर्बंध सोमवारपासून लागू! जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

corona

राज्याने कोरोना नियंत्रणासाठी ठरविलेल्या पाच स्तरातील तिसऱ्या स्तरमध्ये सिंधूदुर्ग जिल्ह्याचा समावेश झाला आहे.

सिंधूदुर्गात कोरोनाचे नवे निर्बंध सोमवारपासून लागू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधूदुर्ग): राज्याने कोरोना (Corona) नियंत्रणासाठी ठरविलेल्या पाच स्तरातील तिसऱ्या स्तरमध्ये सिंधूदुर्ग (sindhudurg) जिल्ह्याचा समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 27 जुलैपर्यंत तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवेशी सबंधित सर्व दुकाने व आस्थापना यांना सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अन्य सोमवार ते शुक्रवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे.

हेही वाचा: सिंधूदुर्ग : कुर्लीतील ज्येष्ठ दाम्पत्यांवर बिबट्याचा हल्ला

सेवा, आस्थापना, उपक्रम याबाबत नवीन आदेश निर्गमित केले आहेत. अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा सर्व दिवशी सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळा

सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार बंद राहतील. मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिन सह), नाटयगृह बंद राहतील. रेस्टॉरंट्स, हॉटेल्‍स, होम स्‍टे, खानावळ सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेुनसार प्रत्यक्ष सुरु राहतील. सायंकाळी 4 नंतर पार्सल सेवा चालू राहील. शनिवार आणि रविवार फक्‍त पार्सल व होम डिलेवरी सुविधा चालू राहील. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणे, सायकलिंग दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील.

हेही वाचा: ओरोस येथे घरावर झाड कोसळले

खाजगी आस्थापना, कार्यालये सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. 4 जूनच्‍या निर्देशानुसार वगळण्‍यात आलेल्‍या सर्व आस्‍थापना जसे खाजगी बॅंका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्‍म वित्‍त संस्‍था व गैर बॅंकीग वित्‍त संस्‍था इत्यादी कार्यालये नियमितपणे कार्यालयीन वेळेपर्यंत सुरु राहतील. शासकीय कार्यालये सहीत सुट असलेली खाजगी कार्यालये 50 टक्के उपस्थितीसह सुरु राहतील. कोरोना विषयक कामे करणाऱ्या आस्‍थापना, मान्‍सुनपूर्व कामांशी संबंधित यंत्रणा, कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. बाहेर मोकळ्या जागेत सकाळी 5 ते सकाळी 9 व सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत खेळ सुरु राहतील. सुरक्षित आवरणामध्‍ये सायंकाळी 4 वाजेपर्यंत चित्रिकरणास मुभा देण्यात आली आहे. सायंकाळी 5 वाजल्यानंतर कुठेही वावरण्‍यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: हायवेग्रस्तांची बैठक ओरोस ऐवजी मुंबईला - प्रमोद जठार

सामाजिक, सांस्कृतिक, करमणुकीचे कार्यक्रम सोमवार ते शक्रवार सभागृह-हॉल आसन क्षमतेच्‍या 50 टक्के उपस्थितीत सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. लग्न समारंभास जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहे. अंत्ययात्रा, अंतविधी यासाठी जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहे. बैठका, निवडणूक -स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा सभागृह, हॉल आसन क्षमतेच्‍या 50 टक्के लोकांच्‍या उपस्थितीत घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. बांधकामासाठी फक्‍त बांधकाम साईटवर निवासी, वास्‍तव्‍यास मुभा देण्यात आली आहे; मात्र बाहेरुन मजूर आणण्‍यासाठी सायंकाळी 4 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे.

हेही वाचा: कोकण, गोव्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

कृषी व कृषी पुरक सेवा संपूर्ण आठवडाभर सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. ई कॉमर्समध्ये वस्तू व सेवा नियमित पूर्ण वेळ - दररोज सुरु राहतील. 5 पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तीस एकत्र येण्‍यास सायंकाळी 5 वाजेपर्यंत मज्जाव असून संचारबंदी सायंकाळी 5 नंतर फक्‍त अत्‍यावश्‍यक कामांसाठी मुभा आहे. व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर्स, स्पा, वेलनेस सेंटर्स दररोज सायंकाळी 4 वाजेपर्यंत क्षमतेच्‍या 50 टक्के पूर्व परवानगीसह एसीच्‍या वापरास विना सुरु राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस) पूर्ण आसन क्षमतेने सुरु करण्यास परवानगी आहे. परंतू प्रवाशांना उभ्‍याने प्रवास करण्‍यास मनाई आहे.

हेही वाचा: अवघ्या 6 तासांत रेल्वे सुरु; कोकण रेल्वेची जलद कामगिरी

जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक, मदतनीस, स्वच्छक किंवा इतर प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह माल वाहतूक नियमित सुरु राहतील. खाजगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा अंतर जिल्हा प्रवास नियमित सुरु राहतील. जर प्रवासी लेवल 5 मधील भागातून अथवा जिल्‍हामार्गे प्रवास करीत असल्‍यास अशा प्रवाशांना ई-पास आवश्‍यक राहील.

loading image