पर्यटकांचा सहकुटुंब मुक्काम गावच्या घरात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

चिपळूण -  नागेश्‍वर दर्शन व ट्रॅकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी चोरवणे ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन होम स्टे सुरू केले आहे. त्यामुळे पर्यटकांना आता स्थानिक ग्रामस्थांच्या घरात मुक्काम करण्याची सोय केली आहे. या सोबत गावकऱ्यांना शिष्टाचार व पर्यटन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

नागेश्‍वर मंदिर व वासोटा भागात मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स व पर्यटकांची गर्दी असते. मुंबई व पुण्यावरुन थेट पर्यटक येथे येत असतात. पर्यटकांना स्थानिक गावकऱ्यांच्या कुटुंबात राहण्याची सोय व्हावी व पर्यटकांना योग्य सेवा देण्याचे प्रशिक्षण देण्याचे ठरले. चोरवणेच्या प्रकाश शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर गावकऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.

घराची स्वच्छता कशी राखावी, पर्यटकांची खोली कशी असावी, पिण्याचे पाणी व भोजनाच्या सोयी कशा असाव्यात, पुरेसा प्रकाश व पंख्याची सोय, पर्यटकांशी संवाद आदी अनेक छोट्या मोठ्या गोष्टी समजावून सांगितल्या. तसेच पर्यटकांसाठी आनंददायी वातावरण तयार करण्याबाबत माहिती दिली गेली. सह्याद्री निसर्ग मंडळाने तज्ञ मार्गदर्शक दिले. चोरवणे गावात एकूण पंधरा पर्यटकांना एकाचवेळी राहता येईल अशी सोय केली. गावातून नागेश्‍वर मंदिराला घेऊन जाण्याची व आणण्याबाबत सेवा उपलब्ध झाली. गाईड देखील उपलब्ध केले आहेत. गावापासून मंदिरापर्यंत ट्रेक आहे. त्यामुळे ट्रॅकर्स देखील येत असतात.

या परिसरात पक्षी निरीक्षणाची सोय आहे. सहकुटुंब येणाऱ्या पर्यटकांना अगदी गावकऱ्यांच्या कुटुंबात राहता येईल. तसेच त्यासोबत उत्कृष्ट भोजन व निवासाचा प्रश्‍न सुटला आहे.
-प्रकाश शिंदे,
ग्रामस्थ 
 
Web Title: New tourism concept special