नवीन गणवेश, दफ्तर, पुस्तके, अानंद, उत्साह आणि मजा 

अमित गवळे
शनिवार, 16 जून 2018

पाली - उन्हाळी सुट्ट्या संपल्यावर जिल्ह्यातील सर्व शाळा शुक्रवारी (ता.१५) सुरु झाल्या.शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य, उत्साह आणि आनंद संचारला होता. शाळांमध्ये नवागतांचे जोरदार स्वागत झाले. प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालकांसह विदयार्थी,शिक्षकांनी सकाळी प्रभात फेरी आणि दिंडी काढली होती.मुलांना पाठ्यपुस्तकांचे वाटप केले गेले. 

शाळेच्या पहिल्या दिवशी सकाळी ७ वाजताच शिक्षक विद्यार्थी व मान्यवर शाळेत उपस्थित होते. यावेळी विवीध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले. सकाळी ७ ते १० या वेळेत शंभर टक्के विदयार्थी उपस्थितीची प्रतिज्ञा दिली गेली.प्रवेशोत्सव व पाठ्यपुस्तक दिन साजरा करण्यात आला.काही ठिकाणी विदयार्थ्यांच्या घरी जावून खाजगी गाडयांमधून विदयार्थ्यांना शाळेत आणण्यात आले. पोषण आहारात पहिल्या दिवशी गोड पदार्थ देण्यात आले.

सुधागड तालुक्यातील राजिप शाळा पिलोसरी येथे ढोलताश्यासह प्रवेशदिंडी काढून इयत्ता १ लीतील दाखलपात्र सर्व विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला.यावेळी फुल, चॉकलेट फुगे देऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व दाखलपात्र विदयार्थ्यांसोबत ज्यादा दाखल विदयार्थी १ ली मध्ये नव्याने दाखल झाली.सकाळी १० वाजल्यापासून नियोजनाप्रमाणे अध्ययनाचे कामकाज उत्साहात सुरु झाले. मुलांची ओळख गप्पा चर्चा खेळ घेण्यात आले. ईलर्निंग व अॅनिमेशन यांचा आस्वाद विदयार्थ्यांनी घेतला. पहिल्या दिवसापासून कृतीयुक्त अध्यनाचा तसेच दप्तराचे ओझे कमी करत अध्ययन कसे होईल याकडे डिजिटल शाळा पिलोसरी ची वाटचाल सुरु झाली. तसेच विदयार्थ्यांना पिलोसरी मंडळा कडून वह्या व दप्तर देण्याचे घोषित करण्यात आले.

या कार्यक्रमास राजिप पिलोसरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष बोरिटकर, उपाध्यक्ष संजना नाडकर व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत सद्यस्या शकुंतला नाडकर उपस्थित होत्या. शाळा मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी सर्वांचे आभार मानले.

शाळेच्या पहिल्या दिवशी खुप मज्जा आली. नवीन मित्रांची ओळख झाली. वर्षभर खेळ व मौज मजेबरोबरच अभ्यासही जोरात करणार आहे. नविन दफ्तर, गणवेश, पुस्तके सर्व काही नविन आहे त्यामुळे खुप आनंद झाला आहे. 
सुजल वाघपंजे, विदयार्थी, ७ वी

Web Title: New uniforms, books, crazy, excitement and fun