पालकमंत्री केसरकरांमुळे जिल्हा विकासात मागे - नीलेश राणे

 बांदा - सभासद नोंदणी अर्ज वितरित करताना निलेश राणे. सोबत प्रमोद कामत, संजू परब, निकिता सावंत, अक्रम खान व इतर.(छायाचित्र- निलेश मोरजकर)
बांदा - सभासद नोंदणी अर्ज वितरित करताना निलेश राणे. सोबत प्रमोद कामत, संजू परब, निकिता सावंत, अक्रम खान व इतर.(छायाचित्र- निलेश मोरजकर)

बांदा - प्रशासनाचा उत्तम अभ्यास असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे अवघ्या महाराष्ट्रातील जनतेचा आवाज आहेत. पालकमंत्री कसा असावा याचे उदाहरण नारायण राणे आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्याला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवले; मात्र चेहरा व आवाज नसलेले पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्याला विकासात मागे नेण्याचेच काम केले असल्याची टिका माजी खासदार निलेश राणे यांनी आज येथे केली.

राणे कुटुंबीयांची नाळ येथील मातीशी जुळली असल्याने आतापर्यंत केवळ लोकसेवेचीच कामे केली आहेत. पक्षाने केलेली कामे कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवावीत,

- निलेश राणे

श्री. राणे पुढे म्हणाले, ""स्वाभिमान पक्ष मोठा करण्याचे काम बांद्यातील कार्यकर्त्यांनी केले आहे. 2019 ची निवडणूक आम्ही सहजरित्या जिंकणार आहोत. सावंतवाडी मतदारसंघातील विरोधक हा धूर्त राजकारणी असूनही संजू परब आणि त्यांच्या टीमचे काम हे कौतुकास्पद आहे. पुढील खासदार निवडणुकीत आपण 2 लाख मताधिकक्‍यांनी निवडून येणार आहोत. आमची लढाई ही विकासासाठी आहे. विरोधक हे केवळ राणे द्वेषी आहेत; मात्र आम्ही सर्वांना पुरून उरणार आहोत.

कार्यकर्त्यांनी गावागावात पक्षाची सभासद नोंदणी वाढवावी. खासदार विनायक राऊत यांना त्यांच्याच गावात किंमत नाही. जिल्ह्यातील मच्छीमारांचे प्रश्न जैसे थे आहेत. जिल्ह्याला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी आपल्या पक्षाच्या हाती सत्ता द्या., असे आवाहनही राणे यांनी केले.

येथील आनंदी मंगल कार्यालयात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ माजी खासदार राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष संजू परब, माजी सभापती प्रमोद कामत, उपसभापती निकिता सावंत, माजी सभापती अंकुश जाधव, व्यापारी संघ अध्यक्ष प्रसाद पावसकर, आदी उपस्थित होते. यावेळी श्री. राणे यांच्या हस्ते सभासद नोंदणी अर्ज वाटप करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com