मच्छिमारांवर आकसापोटी कारवाई केली तर ऐकूण घेणार नाही - नीलेश राणे

राजेश कळंबटे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

रत्नागिरी - सामान्य मच्छिमार आपल्या पोटापाण्यासाठी मासेमारी करतो, आमदारांना त्याचे कष्ट दिसत नाहीत, समस्या दिसत नाहीत, पण यापुढे अशा मच्छिमारांवर आकसापोटी कारवाई केली गेली तर आम्ही ऐकून घेणार नाही, मच्छिमार आणि तुमच्यामध्ये हा निलेश राणे उभा असेल हे लक्षात ठेवा, अशा भाषेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त आनंद पालव यांना आज समज दिली.

शेकडो मच्छिमारांना सोबत घेऊन नीलेश राणे आज रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय कार्यालयावर पोहोचले. आकसापोटी केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे हैराण झालेला मच्छीमारांनी आपल्या व्यथा राणे यांच्याकडे मांडल्या होत्या. 

आमदार सामंतांना राणेंचे खुले आव्हान

आमदार उदय सामंत याना खुले आव्हान देताना निलेश राणे म्हणाले सामान्य मच्छीमारांवर कारवाई करण्यापेक्षा समोर येऊन लढ, आमचा सामना कर.

मिरकरवाडा येथे बुधवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची भव्य सभा झाली. यावेळी असंख्य सत्ताधाऱ्यांकडून न सुटलेल्या समस्या तेथील मच्छीमारांनी पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे मांडल्या. या सभेनंतर तेथील काही उपस्थित मच्छीमारांवर मत्स व्यवसाय विभागाकडून आमदार उदय सामंत यांच्या सांगण्यावरून कारवाई झाल्याची माहिती आज नीलेश राणे यांना समजली. यामुळे संतप्त झालेल्या नीलेश राणे यांनी गुरुवारी सकाळी असंख्य कार्यकर्त्यांसह मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयावर धडक दिली.

आमदाराच्या सांगण्यावरून जर गोरगरीब मच्छीमारांवर कारवाई झाली तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशा भाषेत नीलेश राणे यांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांना आपल्या 'स्टाइल'ने समज दिली. 

मी एलईडीचे समर्थन करायला आलो नाही, जे कायद्यात आहे. ते करा पण जर आमदार उदय सामंत सांगतात म्हणून कारवाई करत असाल तर ही आमदारांची नाटक इथं खपवून घेतली जाणार नाहीत. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी अधिकारी राहणे म्हणजे त्याच्यावर कुणाचा वरदहस्त आहे, हे लक्षात येते. पण त्यामुळे माझ्या मच्छिमारांना लक्ष्य केलं गेलं तर आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ, हेच मालवणला सुद्धा सांगून आलोय आता तुम्हीही लक्षात ठेवा असा इशाराही नीलेश राणे यांनी पालव यांना दिला आहे.

Web Title: Nilesh Rane comment