esakal | ''शिव प्रसाद काय असतो ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईकांना विचारावे''
sakal

बोलून बातमी शोधा

 Nitesh Rane

'शिव प्रसाद काय असतो ते संजय राऊतांनी वैभव नाईकांना विचारावे''

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

'कुडाळ(सिंधुदुर्ग) : कुडाळतील नारायण राणे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये आज सकाळी वाद झाला झाला आहे. यावर नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर हल्लाबोल केला. यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला. राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये दादर येथे वाद झाला होता. अशीच घटना आज सिंधुदुर्गमध्ये घडली आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक यांनी पेट्रोल सवलतीत आणि भाजपवाल्यांना मोफत देण्याच्या विषयावरून येथे शिवसेना-भाजपमध्ये वाद झाला.यावर राणे यांनी ट्विट केले आहे.(nilesh-rane-criticize-shiv-sena-leader-sanjay-raut-political-marathi-kokan-news)

कुडाळ शहरात 100 रूपयात 2 लीटर पेट्रोल देण्याचे व भाजपच्या कार्यकर्त्यांना ओळखपत्र दाखवल्यानंतर मोफत 1 लीटर पेट्रोल देण्याचे आमदार नाईक यांनी जाहीर केले. यासाठी पहिल्यांदा शहरातील माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी संबंधीत पेट्रोल पंपाचे नाव देण्यात आले; मात्र यावरून होणार तणाव लक्षात घेवून दुसरा पेट्रोल पंप यासाठी निवडण्यात आला. पोलिसांनी सकाळपासून राणेंशी संबंधीत पेट्रोलपंपावर कडक बंदोबस्त ठेवला. या पंपाच्या परिसरात भाजपचे कार्यकर्ते जमले. दुपारी आमदार नाईक या भागातून जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावरून काही काळ तणाव निर्माण झाला.

राणे म्हणाले, शिव प्रसाद काय असतो ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईकना विचारावा. पोटभर दिला आज आमच्या कार्यकर्त्यांनी. पाहिजे असेल तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिस मधे.टेस्ट आवडेल नक्की!! असा टोला नितेश राणे यांनी ट्विट करत लगावला आहे.

loading image