esakal | 'ही' शिवेसनेची जुनी खोड ; निलेश राणेंची टिका
sakal

बोलून बातमी शोधा

nilesh rane criticized on shivsena because of nanar project

रायगड निवासस्थानी पत्रकारांशी संवाद...

'ही' शिवेसनेची जुनी खोड ; निलेश राणेंची टिका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - नाणार रिफायनरी संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेला यु टर्न म्हणजे ही शिवेसनेची जुनी खोड असल्याचेच उदाहरण आहे. नाणारच्या मागून शिवसेनेचं दुकान चालणार आहे, असा टोला भाजपचे प्रदेश सदस्य माजी खासदार निलेश राणेंनी लगावला.

रायगड निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, एका मुलाखतीत रिफायनरीविषयी भाष्य करताना मुख्यमंत्री यांनी स्थानिकांनाच्या भावना लक्षात घेणार असल्याचे सांगितले. यावरुन शिवेसेनेने प्रकल्पाविषयी यु टर्न घेतल्याचेच दिसते. रिफायनरीसाठीच्या जमिनी खरेदी करण्यामध्ये स्थानिक शिवसैनिकचही सहभागी होते, हे आम्ही पुर्वीच दाखवून दिले होते. त्यांनीच येथील जमिनी परप्रांतियांना विकल्या होत्या. नाणार हा प्रकल्प पैसे कमवायला मिळणार असल्याचे लक्षात आल्यानंतरच शिवसेनेकडून आपली भुमिका बदली आहे. मोठ्या कंपन्यांन्या काही गोष्टी माहिती असतात. आकडा अपेक्षेपर्यंत वाढला असेल, ते लक्षात आल्यानंतर शिवसेनेकडून आपली भुमिका बदलली गेली आहे.

वाचा - नारायण राणे पोहचले विजयदुर्गवर अन्.... 

कोरोना संदर्भात खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यासाठी त्या डॉक्टर्स्बरोबर सकारात्मक चर्चा करणे गरजेचे आहे. त्यासाठी चिरिमिरी घेणार्‍या लोकांचा उपयोग नाही. त्यासाठी प्लानिंगची गरज आहे. ते जिल्ह्यात झालेले नाही. आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात कोरोनासाठी एखादा कक्ष सुरु करणे शक्य आहे. सिंधुुदुर्गमध्ये आम्ही कोविड सेंटर उभारले आहे. शंभर खाटांची आम्ही मागणी केली असून प्रशासन निर्णय घेणार आहे. तशीच व्यवस्था रत्नागिरीत होणे आवश्यक आहे. इंडिअन मेडिकल असोसिएशनने चाकरमान्यांना घेऊन येण्यासंदर्भात मत व्यक्त करताना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील कमतरता दाखवून दिली होती. जिल्ह्यात खासगी रुग्णालयात 55 तर जिल्हा रुग्णालयात 10 व्हेंटीलेटर्स् आहेत. चाकरमानी हे कोकणात आले पाहीजेत. तो त्यांचा हक्क आहे. या धर्तीवर आवश्यक सुविधाही देणे गरजेचे आहे.

पारदर्शकतेसाठी सीबीआय चौकशीची मागणी

अभिनेता सुशांत रजपूत यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून झाली तर ती पारदर्शक पणे होईल. बिहार पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या भुमिकेकडे लक्ष आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. हे काम मुख्यमंत्री कार्यालयामार्फतच होऊ शकते. एखादा मंत्री दबाव टाकण्याचे काम करु शकत नाही. सुशांत रजपुतच्या संपर्कातील काही जण हे आदित्य ठाकरे यांच्या पार्ट्यांमध्ये उठबस करणारे आहेत. आदित्य मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असल्यामुळे पोलिसांवर दबाव राहील. पारदर्शक तपासासाठी सीबीआय चौकशी आवश्यक आहे, असे मत निलेश राणेंनी व्यक्त केले.

संपादन - मतीन शेख

loading image
go to top