प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या अन्यथा कोकण रेल्वे कार्यालयाला टाळे ठोकणार : निलेश राणे

Nilesh Rane Demanded for justice to Project Affected people
Nilesh Rane Demanded for justice to Project Affected people

रत्नागिरी - आॅनलाइन परीक्षेच्या निकलासह कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या येत्या १५ दिवसात मान्य करा अन्यथा १ सप्टेंबरला कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयाला टाळ ठोकणार असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचा एकत्रित मेळावा कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने गुरुवारी रत्नागिरीमध्ये मराठा मंडळ सभागृहात झाला. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या निलेश राणे यांना प्रकल्पग्रस्तांनी या मेळाव्याला आमंत्रित केले होते. यावेळी कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी आजपर्यंत कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांवर केलेल्या अन्यायाचा पाढाच वाचला. तर माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे खंबीरपणे प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी उभे राहिले हे आवर्जून सांगितले. तर विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यावर टिकास्त्र सोडताना कोकण रेल्वेच्या परप्रांतीय अधिकाऱ्यांसोबत खासदारांचे हितसंबंध जुळले असल्यानेच ते आमच्याशी चर्चेला बसत नाही असा आरोप केला.

यावेळी प्रकल्पग्रस्तांना संबोधित करताना निलेश राणे म्हणाले की केवळ निवेदने, मेळावे घेऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटणार नाहीत तर त्यांना आमच्या पद्धतीने उत्तर द्यावे लागेल. कोकण रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल मला चांगली माहिती आहे. असुर्डे रेल्वे थांबा, दुपदरीकरण, टर्मिनस अशा विविध मागण्या आम्ही कोकण रेल्वेकडे केल्या होत्या, माझा ७० लाखांचा खासदार निधी देऊ केला. पण या परप्रांतीय अधिकाºयांशी फक्त चर्चेने प्रश्न सुटणार नाहीत तर त्यांना आमच्या भाषेतच उत्तर द्यावे लागेल असे निलेश राणे म्हणाले.

प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या मला माहित आहेत, तुमच्यावर होणाºया अन्यायाची जाण आहे, तुम्ही तुमचा हक्क मागताय, तो तुम्हाला मिळालाच पाहिजे. कोकण रेल्वे तुमची आहे. संपूर्ण कार्पोरेशनमध्ये महाराष्टÑाचा वाटा सर्वाधिक आहे. त्यामुुळे आता आमची मुलं तुमच्याकडे नोकरीची भीक मागणार नाहीत, त्यांचा हक्क घेणार आणि त्यासाठी मी तुमच्यावतीने  संघर्ष करायला तयार आहे. आता केवळ चर्चा करायची नाही तर आॅनलाईन परिक्षेचा निकाल या मागणीसह प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न येत्या १५ दिवसांत मार्गी लावले नाहीत तर १ सप्टेंबरला कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयाला मी स्वत: जावून टाळ ठोकणार असा खरमरीत इशारा निलेश राणे यांनी दिला. तुमच्या प्रत्येक मागणीचा टप्प्याटप्प्याने पाठपुरावा करू आणि नियोजनबद्ध पध्दतीने काम करू असेही त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष विनायक मुकादम, सचिव अमोल सावंत, सहसचिव प्रभाकर हातणकर, खजिनदार प्रतिक्षा सावंत, संगमेश्वर तालुकाध्यक्ष अतुल कुंभार, मुंबईविभागप्रमुख काशिराम टक्के, चिपळूण कार्यकारिणी सनी मयेकर, चिपळूण तालुकाध्यक्ष विराज खताते, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हा प्रवक्ते नित्यानंद दळवी, सचिन माजळकर, शहराध्यक्ष अशोक वाडेकर, संकेत चवंडे, रजनी सरदेसाई आदी उपस्थित होते. तर तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com