लॅबप्रश्‍नी नीलेश राणेंची पालकमंत्र्यांवर टीका, म्हणाले....

nilesh rane lab issue press conference konkan sindhudurg
nilesh rane lab issue press conference konkan sindhudurg

कुडाळ (सिंधुदुर्ग) - नारायण राणेंच्या पडवे येथील हॉस्पिटलला कोविड टेस्टिंग लॅबोरेटरी मिळाली तर "मातोश्री'वरून पालकमंत्रिपद जाणार या भीतीने उदय सामंत लॅब होऊ देत नाही, असा आरोप माजी खासदार भाजप नेते नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. जे स्वतःचा मतदारसंघ सुधारू शकले नाहीत, ते जिल्हा काय सुधारणार? असा सवालही त्यांनी केला. 

माजी खासदार राणे यांनी आज एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप पदाधिकारी आनंद शिरवलकर, विशाल परब, भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणे, राजू राऊळ, नगरसेवक राकेश कांदे आदी उपस्थित होते. 
राणे म्हणाले, ""कोरोनाचे मोठे संकट जिल्ह्यावर आहे. आपला जिल्हा ग्रीन झोनवरून रेड झोनकडे जाण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. लॉकडाउनच्या 45 दिवसांनंतर चाकरमान्यांचे जिल्ह्यात आगमन झाले. त्यांच्या तपासण्या झाल्या; पण त्याचे अहवाल अद्याप नाहीत.

एकूणच या कोरोना संकट कालावधीत पालकमंत्र्यांचा कुठेच अंकुश नाही. राज्य सरकारकडून इतर राज्यातील मजुरांप्रमाणे चाकरमान्यांचे लाड झाले नाहीत. ई-पासचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. 10 ते 15 हजारांचा रेट सुरू आहे. सर्वसामान्यांना हा पास मिळत नाही ही खेदाची बाब आहे. सध्या होम क्वारंटाईन 85 हजार, तर संस्थात्मक संख्या फक्त 200 आहेत. पालकमंत्री आपल्या रत्नागिरी मतदारसंघात एक साधे पीपीई किट वाटप करू शकले नाहीत, ते आपल्या जिल्ह्याला काय देणार? ते सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाट लावत आहेत. 

पंधरा दिवस रिपोर्ट मिळेनात 
ज्यांची तपासणी झाली, त्यांचे पंधरा-पंधरा दिवस रिपोर्ट मिळत नाहीत. लोकांच्या जीवांशी खेळू नका. कोरोनावर सरकारचे लक्षच नाही. हे पालकमंत्री साधे एक कोटी रुपये लॅबसाठी आणू शकत नाहीत; मग तुम्ही कसले पालकमंत्री? उद्या लोकांचे जीव गेले तर त्याला जबाबदार कोण? आपले दुर्दैव की आपल्याला असा पालकमंत्री मिळाला. आमची लॅब व सर्व स्टाफ सेवेसाठी मोफत देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आता आपल्याला स्वतःचे रक्षण स्वतःच केले पाहिजे. राज्य शासन काहीही करू शकत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com