रत्नागिरी-सिंधुदुर्गात दिवसाला 50 रुग्णही सापडत नाहीत मग लॉकडाऊन कशासाठी ; निलेश राणे

nilesh rane press conference in kokan
nilesh rane press conference in kokan

रत्नागिरी : मुंबईसारख्या महानगरांमध्ये कोरोनाचे दिवसाला पाच हजार रुग्ण सापडत आहेत. तेथे लॉकडाऊन केलेला नाही. मग ज्या रत्नागिरी-सिंधुदुर्गात दिवसाला 50 रुग्णही सापडत नाहीत, तिथे लॉकडाऊन करण्याचे कारण काय. लॉकडाऊनमुळे जनता संतप्त झाली असून यातून जिल्हाप्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्‍न भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे.


रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत, असे कारण पुढे करून 1 जुलैपासून रत्नागिरीत तर 2 जुलैपासून सिंधुदुर्ग लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. रत्नागिरीत एकूण कोरोना रुग्ण 141 ऍक्टिव्ह आहेत, तर सिंधुदुर्गमध्ये 56 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचवेळी मुंबईत मात्र दररोज 5000 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. मुंबई महानगरांमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन केलेल नाही. मुंबईमध्ये अनेक व्यवहारांना मुभा देण्यात आली आहे. असे असताना रत्नागिरीत रविवारी पत्रकार परिषद घेऊन उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी अचानक 1 जुलैपासून 8 दिवसांपासून लॉकडाऊन केल्याची घोषणा केली. यामुळे सामान्य जनतेची, तसेच हातावर पोट असलेल्या लोकांसमोर मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

अनेकांच्या उद्योग, व्यवसाय आणि रोजगारावर त्याचा परिणाम झाला आहे. अचानक लादलेल्या या लॉकडाऊन चा मोठा फटका मध्यमवर्गीय आणि सामान्य जनतेला बसू लागला आहे. आधीच दोन महिने घरी बसलेल्या लोकांना या कालावधीत थोडा दिलासा मिळत होता, त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरू झाले होते. त्याचवेळी हा लॉकडाऊनचा ब्रेक लागला आहे. हीच स्थिती सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा असून तेथे 2 जुलै पासून लॉक डाऊन सुरू होत आहे. त्या कधीही आणि मनात येईल तेव्हा लागू केल्या जाणार्‍या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेमध्ये संताप व्यक्त होत आहे.


मुंबईमधील कोरोना रुग्णाच्या संख्येशी याची तुलना केली तर दोन्ही जिल्ह्यात मिळून दररोज 50 रुग्णही नाहीत. हे लॉक डाऊन का सूरु केले, या सर्वसामान्य जनतेच्या मनातील प्रश्नाला निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे वाचा फोडली आहे. मुंबईत सरासरी 5 हजार केसेस रोज वाढत आहेत, तरी कडक लॉकडाऊन नाही. ज्या जिल्ह्यांमध्ये सगळे मिळून 1000 केस नाहीत, तिथे कडक लॉकडाऊन का असा सवाल करताना शासन आणि प्रशासन 100 टक्के काहीतरी लपवत आहे अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उमटवत शासन आणि प्रशासन काहीतरी लपवत आहे असा आरोप माजी खासदार राणे यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com