देश कुठल्या संकटात अन् यांच्या मुलाखती! पहा निलेश राणेंचे खळबळजनक ट्विट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

सध्या कोकणात शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक संघर्षाला तोंड फुटले आहे.

रत्नागिरी - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असं ट्विट संजय राऊत यांनी केल्यानंतर त्यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार आणि संजय राऊतांच्या मुलाखतीवर निशाणा साधला आहे. 

सध्या कोकणात शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक संघर्षाला तोंड फुटले आहे. या परिस्थितीत भाजपचे प्रदेश सदस्य नीलेश राणे यांनी केलेल्या ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

निलेश राणे ट्विटमध्ये म्हणाले की, देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत. इतिहासामध्ये जाऊन काही गोष्टी आत्ता कळल्या तरी त्याचा कोणाला काय उपयोग? लोक चिडले आहेत, इंटरव्यूमध्ये इंटरेस्ट कोणाला नाही. तसेच खरं कौशल्य लढ्यामध्ये असतं, बोलण्यात नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

Image may contain: text that says 'Tweet Nilesh N Rane @meNeeleshNRane खळबळ वगैरे काही नाही ही फक्त संज्याची वळवळ आहे. देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत. इतिहासामध्ये जाऊन काही गोष्टी आत्ता कळलया तरी त्याचा कोणाला काय उपयोग? लोकं चिडली आहेत, इंटरव्यू मध्ये इंटरेस्ट नाही कोणाला. खरं कौशल्य लढ्यामध्ये असतं बोलण्यामध्ये नाही. Translate Tweet'

हे पण वाचा -  का घाबरता : मुख्यमंत्री किती कोटीचा निधी देणार ते जाहीर करा :  प्रसाद लाड 

राऊत यांनी घेतलेल्या त्या मुलाखतीत शरद पवार यांनी चीन ते महाराष्ट्रातील घडामोडींवर टिप्पणी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारमध्ये सारेकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. त्यातच मुंबईतील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या तीन दिवसांत अचानक रद्द झाल्यानंतर महाआघाडीत वितुष्ट असल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसात कोकणातही भाजपच्या आत्मनिर्भर रॅलीवरुन शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी सुरु आहे. त्यात नीलेश राणेंनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मुलाखतीवर संजय राऊत यांच्यावरच निशाणा साधल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

<

>


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh rane tweeted criticizing interview between sharad pawar sanjay raut