वाढत्या गर्मीत आरोग्यदायी निरा अन् ताटगोळे ठरतायेत वरदान

अमित गवळे  
सोमवार, 20 मे 2019

पाली : जिल्ह्यात उन्हाची काहिली वाढली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा व ऊर्जा मिळण्यासाठी अनेक जण आरोग्यवर्धक निरा आणि ताटगोळ्यांना अधिक पसंती देत आहेत. विस्तृत कोकण किनारपट्टी असल्याने जिल्ह्यात नारळ आणि शहळ्यां बरोबरच ताटगोळ्यांची झाडे देखील मुबलक आहेत. ताटगोळ्याच्या झाडापासूनच निरा मिळते. परिणामी निरा आणि ताटगोळ्यांना अधिक मागणी आहे.
 

पाली : जिल्ह्यात उन्हाची काहिली वाढली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा व ऊर्जा मिळण्यासाठी अनेक जण आरोग्यवर्धक निरा आणि ताटगोळ्यांना अधिक पसंती देत आहेत. विस्तृत कोकण किनारपट्टी असल्याने जिल्ह्यात नारळ आणि शहळ्यां बरोबरच ताटगोळ्यांची झाडे देखील मुबलक आहेत. ताटगोळ्याच्या झाडापासूनच निरा मिळते. परिणामी निरा आणि ताटगोळ्यांना अधिक मागणी आहे.
 
मुबंई गोवा महामार्ग, पनवेल खोपोली मार्ग, तसेच मुंबई अलिबाग मार्ग या ठिकाणी आवर्जून निरा विक्रेत्यांच्या टपऱ्या पहायला मिळतात. 10 रुपये ग्लास (250 मिली) दराने निरा सहज उपलब्ध होते. त्यामुळे प्रवासी व स्थानिक या स्वस्त आरोग्यवर्धक आणि चविष्ठ पेयाला अधिक पसंती देतात. निरा एक ग्लास पिऊन भागत नाही म्हणून काही जण 2-3 ग्लास सहज फस्त करतात. ही निरा आम्ही अलिबाग वरून आणतो असे एक निरा विक्रेत्याने सकाळला सांगितले. निरा बरोबरच नरम, लुसलुशीत, पाणीदार आणि मधुर चव असलेले ताटगोळे देखील स्थनिक बाजारात मिळतात. हे ताटगोळे 10 रुपये एक किंवा 50 रुपयांना 6 या दराने मिळतात. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आदी तालुक्यात व किनारपट्टीय भागात हे अधिक मिळतात. तेथूनच स्थानिक महिला जिल्ह्यातील इतर बाजारपेठांत ताटगोळे विक्रीसाठी घेऊन येतात. त्यांना देखील यामुळे चांगला रोजगार मिळतो. 

 ताटगोळे व नीरामधून अधिकाधिक कॅलरीज मिळतात. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे या दिवसातील थकवा कमी होण्यास मदत होते. ताडाच्या झाडाच्या खोडातून काढले जाणारे पाणी ‘नीरा’ म्हणून बाजारात उपलब्ध असते. 

 नीरा पिण्याचे फायदे 
''ज्यांना हृदयविकाराचा किंवा रक्तदाबाचा त्रास आहे, असे अनेक नागरिक नीराचा आस्वाद घेतात. एका दिवसात १-२ ग्लास निरा पिणे फायदेशीर ठरते. निरामुळे डिहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते. नीरामधून अधिकाधिक कॅलरीज मिळतात. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे या दिवसातील थकवा कमी होण्यास मदत होते. कुठलीही जाहिरात केली जात नसतानाही नीरा हे पेय लोकप्रिय झाले आहे. नागरिक उन्हाळ्यात पहाटे नीराचा हमखास आस्वाद घेत असतात.''

ताडगोळा खाण्याचे फायदे
डिहायड्रेशन, उष्माघात यापासून बचावण्यासाठी ताडगोळा उपयुक्त आहे. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचा तडाखा शरीरातील उर्जा कमी करतो. शहाळ्याचं गोड पाणी आणि  पातळ मलई जशी आपल्याला रिफ्रेश करते. तसेच जिल्ह्यात मुबलक आढळणारे 'ताडगोळा' हे फळ रिफ्रेश करते. ताडगोळा हे चवीला गोडसर असते.  ताटगोळ्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणामध्ये राहते. ताडगोळा थंड स्वरूपाचा असल्याने शरीरात थंडावा निर्माण करण्यास मदत करतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या उष्णतेचा या दिवसात त्रास होण्यापासून बचाव होण्यास मदत होते. ताडगोळ्यामध्ये सोडीयम,पोटॅशियम यासारख्या मायक्रोन्युट्रीअंट्सचे प्रमाण मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स आणि पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे उन्हाळ्यात जाणवणारा डीहायड्रेशन आणि उष्माघाताचा त्रास कमी होतो. परिणामी थकवा जाणवत नाही.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nira and tactile are healthier in summer