निरव मोदींचा अलिबाग येथील बंगला जमीनदोस्त; बघा फोटो

महेंद्र दुसार
शुक्रवार, 8 मार्च 2019

डाईनामाईड हा बंगला पडण्याचे काम माँ इंटरप्रायझेस भिलवाडा या कंपनीला देण्यात आले असून याबाबत कंपनीचे डायरेक्टर, धर्मीचंदजी खिची यांनी संगितले की, काही क्षणातच पूर्ण बांधकाम जमीनदोस्त होईल.

अलिबाग : पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा गंडा घालणारा मुख्य आरोपी नीरव मोदीचा अलिबाग तालुक्‍यातील किहीम येथील बंगला नियंत्रित स्‍फोटाने अखेर पाडला आहे. शुक्रवारी सकाळी रायगड जिल्हा प्रशासनाचे मुख्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. बंगला पाडण्यासाठी 110 जिलेटीन कांड्या, 30 किलो स्फोटके वापरल्या गेल्या. याचा अंदाजित खर्च 1 कोटी 20 लाखाच्या आसपास होता.

मागील चार दिवसांपासून बांधकाम पडण्याची पूर्वतयारी होती. डाईनामाईड हा बंगला पडण्याचे काम माँ इंटरप्रायझेस भिलवाडा या कंपनीला देण्यात आले होते. याबाबत कंपनीचे डायरेक्टर, धर्मीचंदजी खिची यांनी संगितले की, नीरव मोदी फरार झाल्‍यानंतर सक्‍तवसुली संचालनालयाने त्‍याची मालमत्‍ता जप्‍त केल्‍या आहेत. त्‍यात किहीम येथील बंगल्याचाही समावेश आहे. 70 गुंठे जागेवर समुद्राच्‍या किनारी 30 हजार चौरस फुटांचे बांधकाम करून हा अलिशान बंगला उभा करण्‍यात आला होता.
 

nirav modi

nirav modi

nirav modi

nirav modi

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirav Modis bungalow in alibaug will be demolished