nisarga cyclone live update special story on cyclone
nisarga cyclone live update special story on cyclone

रत्नागिरीकरांना 'निसर्ग'चा दणका ; सकाळ होण्याची वाट पाहत जागवली रात्र

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग वादळाने आज सर्वांची भंबेरी उडवली. सोसाट्याचा वारा, प्रचंड पावसामुळे रात्रभर अनेकांची झोप उडाली. वीजपुरवठा खंडित झाला आणि कधी एकदा सकाळ होते, याची वाट पाहत रात्र जागवली. कोकणात आलेल्या फयान वादळाच्या आठवणी जाग्या झाल्या. निसर्ग वादळाने सारेजण 2 महिने सुरू असलेली कोरोना महामारीची साथ विसरून गेले.


कोकणच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काल रात्री साधारण 8 वाजल्यानंतर वारा, पावसाचा जोर वाढला. टीव्ही व आकाशवाणीवरील बातम्या पाहून अनेकांनी दक्षता घेण्यास सुरुवात केली. कच्च्या घरात राहणारी मंडळी पक्क्या घरात, शेजारी राहायला गेली. रात्री 10 च्या दरम्यान वीजपुरवठा खंडित झाला आणि रात्रभर येऊन जाऊन होता. वादळी पावसाने उकाडा गेला आणि प्रचंड गारठा पडला. अनेक भागात वादळी पावसाने पाणीटंचाई दूर झाली. नदी, नाले, पऱ्याना पाणी आले.

 सोसाट्याचा वारा आणि पावसाने फयान चक्रीवादळाच्या आठवणी जाग्या केल्या. त्यावेळी पहाटे 3 वाजल्यानंतर फयान वादळाला सुरवात झाली होती. तेव्हा वाऱ्याचा वेग बराच होता, झाडे उन्मळून पडली होती. 

त्यावेळी गणेशगुळे गावात सुरू व अन्य मोठी झाडे पडली होती. ग्रामस्थांनी ती तोडून बाजूला करून रस्ता मोकळा केला. आजच्या वादळाने मात्र झाडे कमी प्रमाणात पडली. मात्र फांद्या पडल्या, हिरवी पाने, पालापाचोळा सर्वत्र विखुरला. रस्त्यावर हिरव्या पानाचा खच पडला होता.

मोसमी पाऊस येण्यापूर्वीच आलेल्या निसर्ग वादळाने भरपूर पाणी झाले व बळीराजा सुखावला. आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे. 

रात्रभर पाऊस, वाऱ्याचे थैमान सुरु होते. प्रचंड वाऱ्यामुळे काही झाडे कोसळली, वाकली. नेहमी समुद्राचा येणारा आवाज आज खूपच मोठा येत होता. समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या. किनारी भागात ग्रामस्थांनी दक्षता घेतली. आमच्या हॉटेलचे काही पत्रे उडाले. सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. गणपतीच्या कृपेने संकट दूर झाले.
- विक्रांत रांगणकर, गणेशगुळे ग्रामस्थ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com