इन्सुलेटेड वाहनाबाबत दीपक केसरकर यांची भुमिका चुकीची - नीतेश राणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

देवगड - इन्सुलेटेड वाहन खरेदीची सक्ती पालकमंत्री दीपक केसरकर जिल्ह्यातील स्थानिक मच्छिमारांवर लादत असतील तर ते चुकीचे ठरेल, असे मत आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले आहे. मासळी वाहतुकीसाठी इन्सुलेटेड वाहन वापराच्या अनुषंगाने राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, ‘‘इन्सुलेटेड वाहन खरेदीसाठी ७५ टक्के खर्च राज्य शासन करेल व २५ टक्के खर्च स्थानिक मच्छीमार यांनी करावा असे दीपक केसरकर यांनी मालवणमधील स्थानिक मच्छिमारांशी संवाद साधताना सांगिल्याचे वृत्त आहे.

मुळात श्री. केसरकर यांना स्थानिक व कोकणातील मच्छीमारांच्या भावना समजल्या आहेत का? हाच प्रश्‍न त्यांना विचारावासा वाटतो. स्थानिक मच्छीमार आम्हाला इन्सुलेट वाहनाची गरज नाही असे वारंवार सांगत असूनही गोवा सरकारची भूमिका पालकमंत्री केसरकर स्थानिकांवर लादत असतील तर त्यांची भूमिका चुकीची आहे.

चाळीस लाखाचे इन्सुलेट वाहन खरेदी करण्याचा बोजा स्थानिक मच्छीमारांनी का घ्यावा? हा मुळात मुद्दा आहे. येथील स्थानिक मच्छिमारांवर इन्सुलेट वाहन खरेदी करण्याचा अधिकचा बोजा पडू नये, यासाठी इन्सुलेट वाहनच खरेदी न करता जिल्ह्यात मासे खरेदी- विक्रीसाठी स्वतःची होलसेल बाजारपेठ तयार करत आहोत. पालकमंत्री केसरकर गोवा सरकारची भूमिका स्थानिक मच्छिमारांवर लादत असतील तर त्याला विरोध कसा करायचा हे आम्ही त्यांना दाखवू.’’

Web Title: Nitesh Rane comment