रामदास कदमांसारखे भुकणारे कुत्रे कधी चावत नाही - नितेश राणे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

दाभोळ - नारायण राणे हा कोकणाला लागलेला काळा डाग असून रामदास कदम हा काळा डाग धुवून काढल्याशिवाय राहणार नाही, असा प्रहार पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी  काल (ता.14) दापोली येथे केला होता याला आज आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे प्रत्युतर दिले. भुकणारे कुत्रे कधी चावत नाही, असे राणे यांनी ट्विट केले आहे. 

ट्विटमध्ये नितेश राणे यांनी असे म्हटले आहे की, दिवंगत बाळासाहेब ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील त्यांना कुत्रे  आवडतात. उद्धव ठाकरे यांनी पण तीच परंपरा चालु ठेवली आहे. रामदास कदम च्या रुपात !! सतत भोकत असतो. त्याला हे माहित नाही. भूकणारे कुत्रे कधी चावत नाहीत !! 

दरम्यान काल दापोली येथील सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात दापोली विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात रामदास कदम यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. 

खासदार नारायण राणे यांच्यावर टीका करताना रामदास कदम म्हणाले की राणे मुख्यमंत्री होते त्यांनी कोकणचा काय विकास केला हे सांगा ना, बाळासाहेबांनी त्यांना राज्याच्या सर्वोच्च स्थानावर बसविले होते. त्यांनी शेवटी गद्‌दारी केली. बाळासाहेब मला म्हणाले होते की, रामदास ज्यांनी माझ्या डोळ्यातून पाणी काढलेय तो पूर्णपणे उध्वस्त राहील्याशिवाय राहणार नाही. असा बाळासाहेबांनी त्यांना शाप दिला होता. तुमची औकात काय आहे. राणे यांना सूर्याजी पिसाळाची अवलादीची उपाधी कमी पडेल. शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये गेले नंतर भाजपमध्ये गेले, शरद पवारांशी चर्चा करतात, आता शिल्लक काय आहे रामदास आठवले.

राणेंवर टीका करताना ते म्हणाले की उठसूट मातोश्रीवर बोल, ज्या मातोश्रीने तुम्हाला वैभव दिले त्याच मातोश्रीवर बोलण्याची तुमची औंकाद आहे का, असा सवालही त्यांनी केला. 

Web Title: Nitesh Rane comment