ढपल्यासाठीच प्रतिनिधीची नियुक्ती नाही : राणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

वैभववाडी - ई-पॉस मशिनच्या अनागोंदीमुळे अनेक कुटुंबे धान्यापासून वंचित राहत आहेत. धान्यामध्ये घपला करण्यासाठीच ऑफलाईन धान्य वितरण करताना आवश्‍यक असलेला प्रतिनिधी नेमण्यात आला नसल्याचा आरोप आमदार नीतेश राणे यांनी येथे केला.

वैभववाडी - ई-पॉस मशिनच्या अनागोंदीमुळे अनेक कुटुंबे धान्यापासून वंचित राहत आहेत. धान्यामध्ये घपला करण्यासाठीच ऑफलाईन धान्य वितरण करताना आवश्‍यक असलेला प्रतिनिधी नेमण्यात आला नसल्याचा आरोप आमदार नीतेश राणे यांनी येथे केला.

येथील तालुका दक्षता समितीची सभा आमदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला तहसीलदार संतोष जाधव, सदानंद रावराणे, अनंत फोंडके, अरविंद रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे आदी उपस्थित होते. पॉस मशिनमधील त्रुटी आणि खंडित होणारी इंटरनेट सेवा यामुळे धान्य वितरणात विस्कळीतपणा येत असल्याचा मुद्दा सभेत चर्चेला आला. यावेळी तहसीलदार श्री. जाधव यांनी तालुक्‍यातील ३४ धान्य दुकानांवर धान्य वितरण होत असल्याचे सांगितले. त्यावर आमदार श्री.राणे यांनी आक्षेप घेत जर धान्य लोकांना मिळत असेल तर धान्य मिळत नाही, म्हणून लोकांच्या तक्रारी का येतात, असा सवाल उपस्थित केला. पुरवठा करण्यात येणारे धान्य, ग्राहकांना वितरित करण्यात येणारे धान्य आणि शिल्लक धान्य याचा ताळमेळ बसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

ढपला पाडण्यासाठीच ऑफलाईन धान्य वितरीत करताना आवश्‍यक असलेला प्रतिनिधी नेमण्यात आला नाही. शिल्लक राहणारे धान्य जाते कुठे, असा सवाल देखील राणेंनी उपस्थित केला. 

याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी, पॉस मशिन सेवा पुरवठादार, इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपनीचे प्रतिनिधी, उज्वला गॅस योजनेचे अधिकारी, गॅस पुरवठादार, धान्य दुकानदार आणि सरपंच यांची संयुक्त सभा येत्या आठ दिवसांत घेण्याची सूचना श्री. राणे यांनी केली. 

आमदारांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही
मी लोकशाही मानत नाही, आमदारांना ओळखत नाही, असे अनुद्‌गार पुरवठा शाखेतील एका अधिकाऱ्याने काढले असल्याची माहिती सदस्य सदानंद रावराणे यांनी सभेत देत आमदारांबद्दल अपशब्द काढल्यास खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

Web Title: Nitesh Rane comment