मुलींवर अत्याचार करणारा 'श्रावणबाळ' जन्माला घातला आहे का ? नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा | Monday, 26 October 2020

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर टीका केली होती.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंची बेडकाशी तुलना केल्यानंतर राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. 'तुम्ही काय नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा श्रावणबाळ जन्माला घातला आहे का?' असा सवाल ठाकरे यांना केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देतांना नितेश राणे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

हेही वाचा - नव्वद टक्के कोचिंग क्लासेस डबघाईला ; चालकांच्या चिंतेत वाढ -

राज्य सरकारवर व शिवसेनेवर टीका करणाऱ्यांवर उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून उत्तर दिले. यात त्यांनी नारायण राणे यांच्यावरही टीका केली. त्यांनी दसऱ्या मेळाव्यात म्हंटले होते की 'प्रत्येक दसरा मेळाव्याला काय बोलणार असं विचारलं जातं. पण, टार्गेट करण्यासाठी नाही. पण, सध्या करोना जोरात आहे. बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. काही जणांना इंजेक्शन द्यावं लागतं. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं. काही जण तर अशी बेडक आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही, अशी टीका ठाकरे यांनी केली होती.

उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर नितेश राणे यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. दुसऱ्यांची ‘पिल्ल’ वाईट. मग यांनी काय त्या दिनाच्या खुशीत नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रवणबाळ” जन्माला घातला आहे का? इतकी खुमखुमी आहे ना, मग ती Disha Salain केस मुंबई पोलिसांवर कुठला ही दबाव न टाकता निःपक्षपाती चौकशी करुन दया. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -  शेतात पाणी हाय म्हणून रस्त्यावर मळणी काढलीया -

 

संपादन - स्नेहल कदम