'आमचा अनुभव घेतला असता तर मेडिकल कॉलेजला फायदाच झाला असता'

nitesh rane
nitesh rane
Summary

यावर चर्चा करण्यासाठी किंवा आमच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आम्हाला निमंत्रित करावे.

कणकवली : जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेजला (Sindhudurg Medical College) अपुऱ्या तरतुदी असल्यामुळे त्या त्रुटी पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय समितीने दिलेल्या आहेत. मात्र, (Political News) जिल्ह्यातील विरोधक विनाकारण यात राजकारण करत आहेत. (konkan update) या प्रक्रियेमध्ये आमचा अनुभव घेतला असता तर जिल्ह्याच्या शासकीय मेडिकल कॉलेजला फायदा झाला असता असे मत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. झुम ॲपद्वारे राणे यांनी संवाद साधला आणि विविध विषयावर चर्चा करत असताना जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा उपस्थित झाला. (Thackeray Government)

राणे म्हणाले, जिल्ह्यात नारायण राणे यांचे मेडिकल कॉलेज आहे. याचबरोबर शासकीय मेडिकल कॉलेज झाले तर अधिक मुलांना प्रवेश मिळेल. उपचार सुविधा होतील. त्यामुळे आमचे त्याला सहकार्य राहील. आम्ही कोणतेही राजकारण करणार नाही. मात्र, संकुचित वृत्तीची माणसं यात राजकारण आणत आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारे कर्मचारी नेमण्यात आलेले नाहीत. प्रयोगशाळा नाहीत अशा अनेक अटी त्रुटी आहेत. यावर चर्चा करण्यासाठी किंवा आमच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आम्हाला निमंत्रित करावे.

nitesh rane
...म्हणून पुणेकरांनी फडणवीसांसह माझ्यावर टीका केली - गडकरी

नारायण राणेंचा निश्चित त्यासाठी फायदा होईल. राणे आणि अमित शहा यांची भेट ही निवळ जनआशीर्वाद यात्रेनंतर च्या विषयांसाठी होती. ती पक्षीय भेट होती. त्यामुळे त्या भेटीबाबत उलटसुलट चर्चा करणे चुकीचे आहे. तुम्हाला हिंमत होती तर त्या त्रुटी पूर्ण करून परवानगी का घेतली नाही. ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी केवळ वैद्यकीय महाविद्यालय परवानगी मिळाली असा तोरा मिरवण्यापेक्षा सर्वांच्या सहकार्याने हा विषय हाताळायला हवा. मुळात वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करणे ही सोपी गोष्ट नाही. त्याचा अनुभव आम्ही घेतला आहे. या अनुभवाचा फायदा सत्ताधारी का घेत नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

यापूर्वी केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता होती. त्यांचे केंद्रीय मंत्री होते. त्यावेळी हे मेडिकल कॉलेज का उभे राहीले नाही. राणेंचे मेडिकल कॉलेज झाल्यानंतरच हे कॉलेज सुरू करण्याबाबत कारवाई सुरू झाली. मात्र, ते करत असताना आम्हाला विश्वासात का घेतले गेले नाही. त्यामुळे यात राजकारण आणू नये, आम्ही नेहमीच सहकार्य करायला तयार आहोत असे आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

nitesh rane
Diabetes - मधुमेहाचा त्रास असेल तर 'या' फळांपासून दूरच रहा

दरम्यान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी आपली चर्चा झाली असून या चर्चेनुसार मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत ही नोटीस बजावण्यात आली असून कणकवलीतील पुलाला तडे आणि कोसळलेला पूल यांची संपूर्ण माहिती आपण गडकर यांना दिली आहे. भूसंपादनानंतर रखडलेला मोबदला, याबाबतही आपण माहिती दिलेली आहे. त्यामुळे कणकवलीत निकृष्ट बॉक्स वेल ऐवजी उड्डाणपूल बांधावे अशी आपली मागणी आहे आणि त्याला तत्वतः मान्यता ही गडकरी यांनी दिल्याचे नितेश राणे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com