'सबका टाइम आयेगा' : नितेश राणेंनी डागली शिवसेनेवर तोफ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

नितेश राणे यांनी मुंबई  महापालिकेवर जोरदार टीका केली.

 सिंधुदुर्ग : 'सबका टाइम आयेगा' कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, सर्वांना सारखा कायदा लागू होतो अशी अपेक्षा आहे . शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर जाणार का..? निश्चितच नाही... एवढी हिम्मत ते कसे दाखवू शकतात. सगळ्यांची वेळ येणार आहे अशी टिका माजी आमदार नितेश राणे यांनी ट्विटर अकौंटवरून केली आहे.

 

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौवत हिच्या जूहू येथील कार्यालयामध्ये अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने  कारवाई केल्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई  महापालिकेवर जोरदार टीका केली.

हेही वाचा- धक्कादायक ; अशी काढली पोस्टमास्तरने मृत व्यक्तींच्या खात्यावरील रक्कम -

कंगना  आज मुंबईत पोहोचण्यापूर्वीच महापालिकेने तिच्या ऑफिस वर कारवाई केली.मात्र यावर कंगनाने पुन्हा मुंबई पीओके असल्याचे म्हणत माझे कार्यालय राम मंदिर आहे का  ज्यावर  बाबराने  हल्ला केला अशी टीका केली आहे.
पालिकेकडून कारवाई करण्यात आल्याचे फोटो कंगनाने ट्विट केले असून बाबरची सेना, पाकिस्तान पाकिस्तानव्याप्त काश्मीर असा उल्लेख केला आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitesh Rane has strongly criticized the Mumbai Municipal Corporation (MMC) for taking action against Bollywood actress Kangana Ranaut office