...अन आमदार नितेश राणेंना घ्यावा लागला हातात झाडू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

वैभववाडी - वैभववाडी शहरात वाढत असलेले कचऱ्यांचे साम्राज्य रोखण्यासाठी अखेर आज आमदार नितेश राणेंनाच हातात झाडू घ्यावा लागली. मच्छीमार्केट ते संभाजी चौक अशी स्वच्छता करीत त्यांनी शहरातील नागरिकांना स्वच्छतेचा सदेंश दिला.

वैभववाडी - वैभववाडी शहरात वाढत असलेले कचऱ्यांचे साम्राज्य रोखण्यासाठी अखेर आज आमदार नितेश राणेंनाच हातात झाडू घ्यावा लागली. मच्छीमार्केट ते संभाजी चौक अशी स्वच्छता करीत त्यांनी शहरातील नागरिकांना स्वच्छतेचा सदेंश दिला.

आपल शहर स्वच्छ सुदंर असावे अशी सकंल्पना आमदार नितेश राणे यांनी नगरपंचायत निवडणुकीनतंर मांडली. त्यादृष्टीने कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याकरीता कचराकुंड्या स्वखर्चातुन शहराला दिल्या. मात्र तरीदेखील कचऱ्यांचा प्रश्‍न सुटलेला नाही.काही दिवसापुर्वी वैभववाडी शहरातुन फेरफटका मारत असताना त्यांना स्वच्छतेची समस्या प्रकर्षाने जाणवली. रस्त्याकडेला कचऱ्यांचे ढीग दिसून आले. त्यामुळे त्यांनी शहरात स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे जाहीर केले.

आज सकाळी ९ वाजता स्वच्छ सुंदर वैभववाडी उपक्रमातर्गंत स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली. आमदार नितेश राणे यांनी हातात झाडु घेतल्यानतंर नगरपंचायतीसह कॉग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हातात झाडू घेतला. मच्छीमार्केटपासुन स्वच्छतेला सुरूवात करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा साफसफाई करण्यात आली. दत्तमंदीर परिसर, बाजारपेठेतील रस्त्याच्या दुतर्फा, संभाजी चौक या परिसराची स्वच्छता करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष संपदा राणे, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अरविंद रावराणे, विकास काटे, माजी अध्यक्ष भालचंद्र साठे, अक्षता जैतापकर, प्राची तावडे, भारती रावराणे, अशोक रावराणे, मनोज सांवत, शिवाजी राणे, रवींद्र तांबे, बाळा हरयाण या पदाधिकाऱ्यांसह अनेक लोक या अभियानात सहभागी झाले होते.

वैभववाडी शहर स्वच्छ सुंदर करण्याचा आमचा मानस आहे. परंतु नागरिकांची भुमिका अतिशय महत्वाची असणार आहे. प्रत्येक नागरिकाने शहराला आपले घर मानले पाहिजे.व्यापारी बंधुनी सुध्दा आपआपल्या दुकानातील कचऱ्यांची विल्हेवाट चांगल्या पध्दतीने लावली पाहिजे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने या उपक्रमाला साथ द्यावी.
- नितेश राणे, आमदार

Web Title: Nitesh Rane has to take a broom in the hand