मुंबईत 6 पासून आंबा महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

देवगड : सिंधुदुर्गातील आंबा बागायतदारांना हापूस आंबा थेट ग्राहकांना विक्री करता येणार आहे. यासाठी आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकारातून परेल (मुंबई) येथील दामोदर मैदानावर 6 व 7 मे असे दोन दिवस आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे.

यामध्ये एकूण 35 स्टॉलची व्यवस्था असून मागणी वाढल्यास आणखी स्टॉल उभारण्याची तयारी ठेवल्याची माहिती कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल तेली यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

येथील पक्ष कार्यालयात श्री. तेली पत्रकारांशी बोलत होते. या वेळी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, ज्ञानेश्‍वर खवळे, गणपत गावकर, रवी पाळेकर, उष:कला केळूसकर आदी उपस्थित होते.

श्री. तेली म्हणाले, ''सिंधुदुर्गातील देवगडसह अन्य ठिकाणचा हापूस वाशी फळ बाजारात पाठवला जातो. फळ बाजारात एकदम आंबा दाखल झाल्यास काही वेळा दरात चढउतार होत राहतात. यातून शेतकऱ्याचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनाच ग्राहकांना आपला आंबा थेटपणे विकता यावा, जेणेकरून आपल्या आंब्याला किती भाव मिळाला हे समजू शकेल. तसेच ग्राहकांनाही देवगड हापूसची जवळून ओळख निर्माण होईल या हेतूने आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकारातून मुंबईत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बागायतदारांना महोत्सवात मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले जातील. तसेच बागायतदारांच्या राहण्याची सोय केली जाईल. बागायतदारांना आपला आंबा स्वत: वाहतूक करून महोत्सवात आणावयाचा आहे. सध्या महोत्सवात 35 स्टॉलचे नियोजन असून बागायतदारांची मागणी वाढल्यास त्यांना आणखी स्टॉल उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवली आहे. आपल्यासह तालुकाध्यक्ष संदीप साटम यांच्याशी बागायतदारांनी संपर्क साधावा, तसेच तालुक्‍यातील अधिकाधिक बागायतदारांनी महोत्सवात सहभागी व्हावे. 

सोमवारी नियोजन बैठक 
आंबा महोत्सवाच्या नियोजनासाठी सोमवारी (ता. 1) दुपारी 4 वाजता येथील शासकीय विश्रामगृहानजीक आंबा बागायतदार जनार्दन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या वेळी महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अमोल तेली यांनी केले आहे.

Web Title: Nitesh Rane to organize Mango Festival in Mumbai