निजामपूर मंडल अधिकारी व शिरवली तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

सुनील पाटकर
बुधवार, 27 जून 2018

महाड - शेतजमिनीची फेरफार व सातबारा उतारा नोंद करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्विकारणा-या माणगाव तालुक्यातील निजामपूर मंडल अधिकारी व शिरवली तलाठ्याला रायगड लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे,या प्रकरणामुळे रायगडातील महतूल यंत्रणेतील भ्रष्टाचार पुन्हा उघड झाला आहे.

तक्रारदाराने माणगाव तालुक्यात घेतलेल्या जमिनीची सातबारा नोंद व फेरफार नोंद करायची होती,यासाठी त्यांना शिरवली तलाठी वैभव आंब्रे यांच्याकडे संपर्क साधला होता.तलाठ्याने त्यांना अशी नोंद करण्यासाठी आपल्याला दोन व निजामपूरचे मडल अधिकारी अजय जाधव यांना दोन असे चार हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. या बाबत तक्रारदारांनी रायगड लाचलुचपत विभागाकडे 22 जूनला तक्रार दाखल केली होती त्यानुसार आज या विभागाचे उपअधिक्षक विवेक जोशी, निरिक्षक किरणकुमार बकाले, हवालदार बळीराम पाटिल, विश्वास गंभीर, जागृती पाटील व निशांत माळी यांनी
सापळा रचला व या दोघांना त्यांच्या कार्यालयात चार हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.

Web Title: Nizampur Divisional Officer and Shirvali Talathi in the anti corruption Department