काँँग्रेस जिल्हाध्यक्षांनी यांना व्हीप का बजावला ?

No Legal Right To Send Whip To Ranjeet Desai
No Legal Right To Send Whip To Ranjeet Desai

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) : कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांना आम्हाला व्हीप बजावण्याचा कोणताही कायदेशीर आणि नैतिक अधिकार नाही. त्यांनी वॉट्‌सऍपद्वारे बजावलेली नोटीस बेकायदेशीर असुन आम्ही त्याची दखल घेत नसल्याची माहिती भाजपचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद गटनेता रणजित देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृह येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत श्री. देसाई बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष चारूदत्त देसाई, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख निलश तेंडुलकर, नगरसेवक विनायक राणे, सुनिल बांदेकर, नगरसेविका सौ.संध्या तेरसे, सौ.साक्षी सावंत, दिपक नारकर, राजेश पडते, राकेश कांदे, सौ. रेखा काणेकर, राजवीर पाटील आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

श्री.देसाई म्हणाले, राष्ट्रीय कॉंग्रेसच्या चिन्हावर 27 जिल्हा परिषद सदस्य निवडुन आले होते. त्यानंतर राष्ट्रीय कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या सदस्यांनी अधिकृत गटस्थापन केला. त्याला शासनाची मान्यताही मिळाली होती; मात्र या गटाचे गटनेते सतीश सावंत यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे गटनेत्याची पुन्हा निवड करणे बंधनकारक होते. त्यानुसार आज खासदार नारायण राणे यांच्या कणकवलीतील ओम गणेश या निवासस्थानी सर्व जिल्हा परिषद सदस्यांची बैठक झाली. यात आपली सर्वानुमते गटनेतापदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे 6 जिल्हा परिषद सदस्य असुन आमचा गट लवकरच कायदेशीररित्या भाजपमध्ये विलीन केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या 50 संख्याबळापैकी 1 पद रिक्त आहे. उर्वरीत 49 सदस्यांपैकी 30 सदस्य आमचे असुन आम्हाला चांगले बहुमत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर निश्‍चितच आमची सत्ता राहणार आहे.

व्हीप बजावल्याचे सकाळी वृत्तपत्रातून समजले

कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी जिल्हा परिषद सदस्यांची बैठक आयोजित केली होती. त्याचे निमंत्रण वॉट्‌सऍपच्या माध्यमातुन आम्हाला देण्यात आले. त्यांनी सदस्यांना व्हीप बजावल्याचे सकाळी वृत्तपत्रातील नोटीसवरून कळाले; मात्र कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांना आम्हाला व्हीप बजावण्याचा कोणताही कायदेशीर अथवा नैतिक अधिकारी नाही. त्यांनी बजावलेली नोटीस ही बेकायदेशीर असुन आम्ही त्याची दखल घेत नाही, असेही देसाई यांनी सांगितले

यासाठीच व्हीप पाठवल्याचा आरोप

आमच्यावर त्यांना जी काय कारवाई करायची असेल ती जरूर करावी. अडीच वर्षात कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी आम्हाला साधा एक फोन केला नाही किंवा आमची दखल घेतली नाही. राज्यात महाशिवआघाडी अस्तित्वात येत असल्याचे लक्षात घेऊन जिल्ह्यात आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांचा हा खटाटोप असल्याचा आरोप देसाई यांनी यावेळी केला. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com