अांबोली येथील सात धबधब्यांना सर्कीट करण्याच्या वनविभागाला सूचना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

आंबोलीतील धबधब्यांचा प्रवाह कमी झाला आहे. जुन संपत आला तरी त्याठिकाणी ओसंडून वाहणारे पाणी दरवर्षी प्रमाणे वाहताना दिसत नाही.

सावंतवाडी - आंबोलीचे धबधबे बारमाही वाहण्यासाठी सात धबधब्याचे सर्कीट करण्याच्या वनविभागाला सूचना दिल्या होत्या; मात्र त्यात काही त्रुटी राहिल्यास तज्ञांचा सल्ला घेवून योग्य ती भूमिका घेवू. गरज भासल्यास ते बंधारे काढुन टाकण्यात येतील, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

आंबोलीतील धबधब्यांचा प्रवाह कमी झाला आहे. जुन संपत आला तरी त्याठिकाणी ओसंडून वाहणारे पाणी दरवर्षी प्रमाणे वाहताना दिसत नाही. याबाबत श्री. केसरकर यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी याबाबतची माहीती दिली.

ते म्हणाले, आंबोली हे वर्षा पर्यटनासाठी नावारुपास आलेले पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे त्या ठीकाणी येणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. तेथील पर्यटनाची वाढ होवून स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी धबधबे बारमाही कसे वाहतील याबाबतचे नियोजन करण्याच्या सुचना वनविभागाला दिल्या होत्या. त्यासाठी येणारे पाणी एकत्र रहावे, यासाठी नियोजन करण्याच्या सुचना त्यांना दिल्या होत्या. त्यासाठी वरच्या बाजूने बंधारे बांधून सात धबधब्याचे सर्कीट करण्याचा प्लान होता, मात्र नेमके काय झाले आहे. कशामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे? याचा शोध घेण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास त्याठिकाणी तज्ञ लोकांची मदत घेण्यात येणार आहे. मात्र काही झाले तरी त्याचा परिणाम पर्यटनावर होवू देणार नाही. गरज भासल्यास बंधारे सुध्दा काढण्यात येणार आहेत, असे श्री केसरकर यांनी सांगितले.


श्री केसरकर पुढे म्हणाले सात धबधब्यांचे सर्कीट बनविण्यात येणार आहे. त्यातील चार धबधब्याचे काम आता होणार होते. तर अन्य तीन धबधबे पावसाळ्यानंतर जोडण्यात येणार होते. मात्र त्यात काही त्रूटी राहील्या असतील तर त्या निश्‍चितच दुर करण्यात येतील. यात काही शंका नाही तर दुसरीकडे आंबोलीला बाराही महीने पर्यटक थांबणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Notice to the Forest department about Waterfall at Amboli