"फुले यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या"

मुझफ्फर खान
Wednesday, 7 October 2020

राष्ट्रीय जनसेवा पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन 

चिपळूण (रत्नागिरी) :  नुकतेच कामठी (नागपूर) येथील सलून व्यावसायिक सुदेश हंसराज फुले यांना अनोळखी मारेकऱ्याने ठार मारले. 25 सप्टेंबर 2020 ला फुले यांची हत्या झाली तरी पोलिसांना मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. त्यांचा शोध घेऊन त्यांना फासावर लटकवावे, या मागणीसाठी राष्ट्रीय जनसेवा पक्षासह चिपळूण तालुक्‍यातील नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कोकण विभाग संघटक अरुण शिंदे, जिल्हा संघटक सुरेश जाधव, चिपळूण तालुकाध्यक्ष किरण चव्हाण, शहराध्यक्ष विजय शिंदे आदी उपस्थित होते. 

रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या कार्याला सुरवात झाली आहे. या पक्षाच्या माध्यमातून नाभिक समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी या समाजातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताराम कदम यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यातील नाभिक समाज आतापर्यंत विविध पक्षात विखुरलेला होता. आमच्या समाजाची संघटना आहे. परंतु तो कोणत्याही एका पक्षाला बांधिल नाही. सर्वच पक्षात आमच्या समाजाचे कार्यकर्ते असताना समाजाला कोणीही न्याय मिळून दिला नाही. नाभिक समाजाला एकत्र आणून समाजातील लोकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी महावीर गाडेकर व संजय पंडित यांनी राष्ट्रीय जनसेवा पक्षाची स्थापना केली. 

हेही वाचा- रत्नागिरीतील घटना : विजेच्या धक्क्याने वायरमन खांबाला चिकटला -

नाभिक समाजाचा एससीएसटी वर्गात समावेश करावा. प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी जिवामहाले यांचे स्मारक व्हावे, आदी मागण्यांसाठी पक्षाच्या माध्यमातून काम करणार आहोत. 
-दत्ताराम कदम, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय जनसेवा पक्ष 
 

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nuclear society started on National Public Service Party ratnagiri district