वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सुरु केली पाणपोई

लक्ष्मण डूबे
शनिवार, 5 मे 2018

सम्यक सामाजिक संस्था रसायनी अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज शनिवार (ता 05) रोजी पाणपोई सुरू केली आहे.

रसायनी (रायगड ) : रसायनी पाताळगंगा परिसराचे मुख्यालय वासांबे मोहोपाडा येथे बाजारपेठेत पाणपोईची सुविधा नसल्यामुळे येथे बाजारात किंवा इतर कामासाठी येणाऱ्या नागरिकांची पाणी पिण्यासाठी गैरसोय होत होती. दरम्यान सम्यक सामाजिक संस्था रसायनी अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज शनिवार (ता 05) रोजी पाणपोई सुरू केली आहे.

या पाणपोईचे उद्घाटन रसायनी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी मोहोपाड्याचे सरपंच कृष्णा पारंगे, माजी सरपंच संदीप मुंढे, माजी सदस्य मामा कांबळे आदि उपस्थित होते. तर प्रकाश गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मोहोपाडा बाजार पेठेत पाणपोई सुरू केली आहे. त्यांच्या या सामाजिक कामाची उपस्थित मान्यवरांनी आणि परिसरातील प्रतिष्ठित  नागरिकांनी प्रशंसा केली.

दरम्यान, या पाणपोईमुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांची पाणी पिण्यासाठी चांगली सोय होणार असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे. तर पाऊस पडेपर्यंत पाणपोई सुरू राहिल असे प्रकाश गायकवाड यांनी 'सकाळ'ला सांगितले. 

Web Title: On the occasion of birthdays they started watertank