संकष्टी चतुर्थीनिमित्त वासांबे मोहोपाडा येथुन महडपर्यंत पायदिंडी

लक्ष्मण डुबे 
गुरुवार, 24 जानेवारी 2019

रसायनी (रायगड) - संकष्टी चतुर्थीनिमित्त आज (गुरुवार) आष्टविनायकांपैकी एक श्री क्षेत्र वरदविनायक महडपर्यंत वासांबे मोहोपाडा येथुन परीसरातील गणेश भक्तांनी पायदिंडी काढली आहे. या पायदिंडीत परीसरातील वारकरी सामील झाले आहे. 

सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास रसायनीतील वासांबे मोहोपाडा येथुन टाळ मृदूगाच्या गजरात हाती भगव्या पतका घेऊन, "मोरया मोरया गणपति बप्पा मोरया"च्या गजरात परीसरातील गणेश भक्तांची दिंडी श्री क्षेत्र वरदविनायक महडकडे निघाली आहे. 

दांडफाटा, चौकहुन दिंडी महड येथे जाणार आहे. दिंडी सोहळ्याचे हे पाचवे वर्ष आहे. तर नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात येणा-या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पायदिंडी काढण्यात येत आहे. आशी माहिती दिंडीचे संयोजक मारुती खाने यांनी दिली आहे. 

या पायीदिंडीत कृष्णा जोडे, राघु भोईर, अनंत जुनगरे, देवेन्द्र पाटील, जयंवत पाटील आणि इतर वारकरी सामील झाले आहे. 

Web Title: on the occasion of Chashurthi Mohopadha to mahad dindi

टॅग्स