पावसामुळे घराची भिंत कोसळून सिंधुदुर्गात वृद्धा ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

वेंगुर्ला - सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शिरोडा चव्हाटावाडी येथे घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत वृद्धेचा मृत्यू झाला.  विजया विठ्ठल पडवळ (७५) असे त्या वृद्धेचे नाव आहे. रात्री सर्व झोपेत असताना ही भिंत कोसळली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पडवळ ह्या भिंतीच्या बाजूला झोपल्या होत्या. संपूर्ण घर मातीचे असल्याने पावसाचे पाणी झिरपून ही घटना घडली. रात्री घडलेली हा प्रकार सकाळी लक्षात आला. त्यानंतर सत्यविजय साळगावकर, योगेश शिरोडकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल गावडे, कौशिक परब, माजी उपसरपंच दत्तगुरु परब यांनी घराची पाहणी करून महिलेस शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे  दाखल केले. मात्र यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट केले.

यावेळी सरपंच मनोज उगवेकर , ग्रामविकास अधिकारी चव्हाण, पोलीस निरीक्षक भिसे, वेंगुर्लेकर, बाबल गावडे, रोहित पडवळ उपस्थित होते

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old woman dead in wall collapse