गावखडी समुद्र किनाऱ्यावर कासव संवर्धन (व्हिडिओ)

सुधीर विश्‍वासराव
मंगळवार, 19 मार्च 2019

गावखडी समुद्रकिनार्‍यावरील वातावरण कासवांच्या प्रजननासाठी उत्तम असल्याने त्यांनी हे ठिकाण निवडले आहे. कासव संवर्धनाच्या दृष्टीने चांगली दृष्टी असल्याने कास संवर्धन प्रक्षेत्र बनले आहे. यापूर्वी तीन घरट्यांतून पिल्ले संरक्षित करून समुद्रात पाठविण्यात आली. आज सकाळच्या प्रहरी 152 पिल्ले सोडण्यात आली. अजून 10 घरटी असून त्यातून येत्या काही महिन्यांत आणखी पिल्ले समुद्रात झेपवतील अशी आशा आहे.

- प्रदीप डिंगणकर,  सदस्य, निसर्गयात्री संस्था

पावस - रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनार्‍यावर कासव बचाव कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी निसर्गयात्री संस्था व गावखडी ग्रामपंचायत यांनी संरक्षित केलेल्या ऑलिव्ह रिडलेच्या 152 पिलांनी समुद्राकडे धाव घेतली. पिलांची समुद्राकडे सुरू असलेली झेप पाहण्याकरिता पर्यटकांनी गर्दी केली होती.

रत्नागिरीतील निसर्गयात्री संस्था गेली तीन वर्षे कासव बचावचे कार्य करीत आहे. याकरिता गावखडी समुद्रकिनारा कासवाच्या पिलांचे सर्वेक्षण करण्याचे केंद्र बनले आहे. या संस्थेने दोन वर्षांत सुमारे 600 पिलांना जीवदान देऊन संरक्षित केले आहे. दोन महिन्यापूर्वी निसर्गयात्री संस्था व ग्रामपंचायत गावखडी यांच्या पुढाकाराने प्रदीप डिंगणकर व राकेश पाटील यांनी घरट्यातील 100 पिल्ले समुद्रात सोडली होती.

या किनार्‍यावरील चौथ्या व पाचव्या घरट्यातील 152 पिल्लांना 19 मार्चला सकाळी पावणेसात वाजता रत्नागिरीचे प्रांत अमित शेडगे, वाहतूक शाखेचे अनिल विभुते, वनरक्षक दीपाली सुतार-कुबल, कोकण कृषी विद्यापीठाचे जीवशास्त्र संशोधक डॉ. आशिफ पांगारकर, रेंजर श्री. कांबळे, पशुवैद्यकीय अधिकारी स्वरूप काळे, निसर्गयात्री संस्थेचे सदस्य व प्राणिमित्र प्रदीप डिंगणकर, राकेश पाटील यांच्या उपस्थितीत कासवाच्या पिलांना समुद्राकडे झेप घेतली.

गावखडी समुद्रकिनार्‍यावरील वातावरण कासवांच्या प्रजननासाठी उत्तम असल्याने त्यांनी हे ठिकाण निवडले आहे. कासव संवर्धनाच्या दृष्टीने चांगली दृष्टी असल्याने कास संवर्धन प्रक्षेत्र बनले आहे. यापूर्वी तीन घरट्यांतून पिल्ले संरक्षित करून समुद्रात पाठविण्यात आली. आज सकाळच्या प्रहरी 152 पिल्ले सोडण्यात आली. अजून 10 घरटी असून त्यातून येत्या काही महिन्यांत आणखी पिल्ले समुद्रात झेपवतील अशी आशा आहे.

- प्रदीप डिंगणकर, सदस्य,  निसर्गयात्री संस्था

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: olive ridley turtles conservation on Gavkhadi Beach in Ratnagiri