नोटबंदीला ८ नोव्हेंबरला पाच वर्षे पूर्ण झाली मात्र | kokan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोटबंदीला ८ नोव्हेंबरला पाच वर्षे पूर्ण झाली मात्र

नोटबंदीला ८ नोव्हेंबरला पाच वर्षे पूर्ण झाली मात्र

sakal_logo
By
तुषार सावंत

कणकवली : नोटबंदीला ८ नोव्हेंबरला पाच वर्षे पूर्ण झाली मात्र, देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मोदी सरकारकडे ठोस असा कार्यक्रम नाही. त्यामुळे पेट्रोल डिझेल आणि स्वयंपाक गॅसचे दर वाढून मोदी सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये 21 लाख कोटी रुपये जमा केल्याचा दावा केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य तथा माजी खासदार डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

कणकवली मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अंड इकॉनोमिक चेंज या संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकासावर आधारित ५० अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. या संस्थेच्या दोन मजली नव्या इमारतीचे भूमिपूजन डॉ. मुणगेकर यांच्या हस्ते आज झाले त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर ते म्हणाले केंद्र शासन आर्थिक घडी बसवण्यामध्ये अपयशी ठरले आहे नोटबंदी नंतर गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली आहे. ती वाचवण्यासाठी इंधनाचे दर भरमसाठ वाढवले जात आहेत इंधनाचा दर प्रति बॅलर १५३ रुपये असताना आज ११५ रुपयांनी पेट्रोल लिटर खरेदी करावी लागत आहे. मात्र पोटनिवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर पाच रुपये कमी करण्यात आले.

हेही वाचा: मावळातील 'त्या' आंदोलनाला आज ९ वर्षे पूर्ण झाली, मात्र अद्यापही तो प्रश्‍न अनुत्तरितच

मोदी सरकारने बॅड बँक तयार केली आहे यातून मोठ्या उद्योगपतींचे सहा लाख कोटीचे थकीत कर्ज माफ करण्यात आले मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांची दहा हजाराची शेती कर्ज माफ होत नाही ही शोकांतिका आहे. एसटी महामंडळाच्या संपावर तीव्र नाराजी व्यक्त करून ते म्हणाले एसटी महामंडळ प्रमाणे राज्य शासनाकडे ४४ महामंडळ आहेत त्यामुळे एका महामंडळाचे विलीनीकरण करणे सरकारला परवडणारे नाही. त्यामुळे संप हा पर्याय नसून एसटीचे शास्त्र युक्त अभ्यास करून एसटीला ऊर्जितावस्था कशी आणली जाईल याकडे पाहण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतून ४३कोटी रुपये मागे जातात ही बाब असमर्थनीय आहे महामार्गाच्या दुरावस्था बाबतही श्री मुंणगेकर यांनी टीका करत नमूद केले. की कोकणातील नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा केंद्र सरकार कडून महत्त्वाच्या राज्यांना आणि कोकणाला जोडणाऱ्या या महामार्गाच्या दुरूस्तीसाठी आपली ताकद वापरण्याची गरज आहे

loading image
go to top