"फक्त लढ म्हणा' अव्वल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

मालवण - येथील स्वराध्या फाउंडेशनतर्फे झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत कुडाळच्या "फक्त लढ म्हणा' या एकांकिकेने मामा वरेरकर करंडक पटकाविला. फक्त लढ म्हणा या एकांकिकेने उत्कृष्ट दिग्दर्शन, पुरुष अभिनय, पार्श्‍वसंगीतातही वर्चस्व राखले. स्पर्धेत मुंबईच्या दर्दपुरा व भगदाळ या एकाकिकांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. 

मालवण - येथील स्वराध्या फाउंडेशनतर्फे झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत कुडाळच्या "फक्त लढ म्हणा' या एकांकिकेने मामा वरेरकर करंडक पटकाविला. फक्त लढ म्हणा या एकांकिकेने उत्कृष्ट दिग्दर्शन, पुरुष अभिनय, पार्श्‍वसंगीतातही वर्चस्व राखले. स्पर्धेत मुंबईच्या दर्दपुरा व भगदाळ या एकाकिकांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. 

देवगडच्या फायनल डिसिजन या एकांकिकेस उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर उत्कृष्ट नवलेखन पुरस्कार देवगडच्या सोनल उतेकर (फायनल डिसिजन), तर (कै.) श्रीकांत देसाई उत्कृष्ट वाचक अभिनय पुरस्कार इचलकरंजीच्या संतोष आवाळे (अल्पविराम) यांना देऊन गौरविण्यात आले. 

येथील स्वराध्या फाउंडेशनच्यावतीने येथील पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे दोनदिवसीय राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ परीक्षक, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते योगेश सोमण व नाट्यअभिनेते रवींद्र देवधर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी स्वराध्याचे अध्यक्ष सुशांत पवार, शांती पटेल, मुकेश बावकर, किरण वाळके, सुनील परुळेकर, संध्या परुळेकर, गौरव ओरोसकर, गौरीश काजरेकर, रूपेश नेवगी, अभय कदम, विनायक भिलवडकर, दीपक जाधव, महेश काळसेकर, विलास देऊलकर, महेश पाटकर, सचिन टिकम आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

नाट्यगृहाची वीज व्यवस्था यशस्वीपणे सांभाळल्याबद्दल सुभाष कुमठेकर व राजा केरीपाळे, ज्येष्ठ नेपथ्यकार तारक कांबळी, रूपेश नेवगी व ज्येष्ठ नाट्य अभिनेते राजेंद्र कदम यांचा स्वराध्या गौरव करण्यात आला. 

अभिनेते योगेश सोमण यांनी नाट्यरसिकांशी दिलखुलास संवाद साधला. एकांकिका नवोदित कलाकारांसाठी एकांकिका मोठे व्यासपीठ आहे. कलाकारांनी रंगमंदिरात भूमिका सादर करताना बागडायला हवे. भूमिका साकारताना अभिनयाचे आत्मपरीक्षण करून आपली भूमिका नाण्याप्रमाणे वाजली पाहिजे, असे सांगितले. या वेळी स्वराध्या फाउंडेशनचे कौतुक करताना एकांकिका स्पर्धात्मक झाल्या. सर्व संघ स्पर्धेचे भान ठेवून जिंकण्यासाठी प्रयत्न करत होते. बऱ्याच नवोदित कलाकारांनी चोख भूमिका साकारली, असेही त्यांनी सांगितले. 

स्पर्धेचा उर्वरित निकाल असा - दिग्दर्शन - प्रथम प्रशांत लोखंडे (भगदाळ), द्वितीय केदार देसाई (फक्त लढ म्हणा), तृतीय जयंत सुत (दर्दपुरा). पुरुष अभिनय - केदार देसाई (फक्त लढ म्हणा), द्वितीय अभिषेक गावकर (भगदाळ), तृतीय नंदकिशोर जुवेकर (बनी तो बनी). स्त्री अभिनय - प्रथम सोनाली छाया (दर्दपुरा), द्वितीय प्रियांका हांडे (भगदाळ), तृतीय वृषाली जावळे (दर्दपुरा). प्रकाश योजना - प्रथम राजेश शिंदे (भगदाळ), द्वितीय सत्येंद्र जाधव (पार्टनर्स), तृतीय नंदकिशोर जुवेकर (बनी तो बनी). पार्श्‍वसंगीत - प्रथम भूषण तेजम (फक्त लढ म्हणा), द्वितीय राजस पंध्ये (दर्दपुरा), तृतीय स्वप्नील तांबे (पार्टनर्स). नेपथ्य - प्रथम गणेश गावकर (भगदाळ), द्वितीय बबन सुतार (ती), तृतीय श्रेयस म्हसराम व अनुप माने (दर्दपुरा).

Web Title: one act play