सार्वजनिक गणेशोत्सव यंदा `येथे` दीड दिवसांचा

One And Half Day Ganesh Festival In Chiplun Ratnagiri Marathi News
One And Half Day Ganesh Festival In Chiplun Ratnagiri Marathi News

चिपळूण ( रत्नागिरी ) - यावर्षी श्री सार्वजनिक गणेशोत्सवाचा कालावधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड दिवसांचा करण्यावर एकमत झाले. गणेशोत्सवाच्या काळात सुरक्षित अंतर राखून व शासनाचे सर्व नियम पाळून दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आले. 

येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची "गणेशोत्सव 2020' आयोजनाबाबत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेतला. गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी, 22 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा होईल. दुपारी महानैवेद्य दाखवला जाईल. रात्री आरती व मंत्रपुष्पांजली होईल. 

दुसऱ्या दिवशी म्हणजे ऋषी पंचमीच्या दिवशी रविवारी, 23 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी मंत्रौपचार पूजा व दुपारी महानैवेद्य व नंतर उत्तरपूजा होऊन सायंकाळी श्रींचे साधेपणाने विसर्जन होईल. श्रींची विसर्जन मिरवणूक होणार नाही. या वर्षी फक्त पूजेची दीड-दोन फुटांची शाडूमातीची मूर्ती आणली जाणार आहे.

श्रावणातील मोफत आयुर्वेदिक उपचार शिबिराबाबत वैद्य मंडळ, चिपळूण यांच्याबरोबर चर्चा करून यावर्षी शिबिर आयोजित करावयाचे अथवा नाही याचा निर्णय घेण्याचे ठरले. गरजू विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट टळल्यावर शासनाच्या आदेशानुसार उक्ताड येथील बालवाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एप्रिल 2020 मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील उक्ताड परिसरातील गरीब-गरजू 30 कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तूंच्या पॅकेटचे वाटप केले आहे. तसेच यावर्षी वर्गणी न जमविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. तरीसुद्धा काही भक्तगणांना मंडळाच्या बालवाडी, व्याख्यानमाला, शिष्यवृत्ती यासारख्या विविध उपक्रमांना आर्थिक सहकार्य करावयाचे असेल त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.

सर्व निर्णय बैठकीला उपस्थित सदस्यांनी एकमताने घेऊन शासनाला कोरोनाच्या संकटात पूर्ण सहकार्य करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ पाटणकर, कार्याध्यक्ष रमण डांगे व सचिव नित्यानंद भागवत यांनी दिली आहे. बैठकीला प्रकाश काणे, रमण डांगे, विजय बागवे, शेखर सावले, विलास चौघुले, विलास बांद्रे, शरद तांबे, समीर जानवलकर उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com