झारखंडचे दीड हजार मजूर स्वगृही 

One And Half Thousand Laborers Return To Jharkhand From Sindhudurg
One And Half Thousand Laborers Return To Jharkhand From Sindhudurg

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - कोरोनामुळे जाहीर लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या झारखंडमधील मजूर व अन्य नागरिकांना घेवून जाणारी श्रमिक रेल्वे काल (ता. 23) रात्री सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन येथून रवाना झाली. 1 हजार 545 मजुरांची रवानगी झारखंड येथे करण्यात आली. सिंधुदुर्ग प्रशासनाकडून परराज्यातील कामगारांसाठी आतापर्यंत चार श्रमिक रेल्वे सोडल्या आहेत. कर्नाटकात दोन, मध्य प्रदेशात एक व झारखंडमध्ये एक अशा या चार श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या. 

राज्यशासन व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून शनिवारी सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकातून झारखंडमधील हातिया स्थानकाकडे श्रमीक विशेष रेल्वे रवाना करण्यात आली.

जिल्ह्यातून सोडलेल्या या चौथ्या श्रमीक रेल्वेतून 1 हजार 545 मजूर व कामगार झारखंडकडे रवाना झाले. यावेळी मजूरांच्या चेहऱ्यावर समाधान व गावी जाण्याचा आनंद दिसून येत होता. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना फुड पॅकेट्‌स, पाणी बॉटल, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांमधून मजूर व कामगार यांना एसटी बसने सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. त्यामध्ये वेंगुर्ले तालुक्‍यातील 237 मजूर 12 बसमधून, मालवण - 491 मजूर 25 बस, कुडाळ - 372 मजूर 22 बस, सावंतवाडी - 384 मजूर 19 बस, देवगड - 37 मजूर 2 बस आणि वैभववाडी तालुक्‍यातील 24 जण 1 बस मधून असे एकूण 81 बसमधून सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकामध्ये 1 हजार 545 मजुरांना आणण्यात आले. 

यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, सुशांत खांडेकर, उपजिल्हाधिकारी प्रशांत ढगे, सावंतवाडी पोलीस उपअधीक्षक शिवाजी मुळीक यांच्यासह स्टेशन मास्तर वैभव दामले, संबंधित तालुक्‍यांचे तहसिलदार आदी उपस्थित होते. 

रेल्वेमध्ये प्रवासी बसत असताना कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली 10 पोलीस अधिकारी व 70 पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त सांभाळला. प्रवाशांना रेल्वेमध्ये बसवताना, खाद्य पाकीटे व पाणी बॉटलचे वाटप करताना सोशल डिस्टंसिंगचे योग्य ते पालन करण्यात आले. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com