गृहप्रकल्पाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

रत्नागिरी : नवाथे कन्स्ट्रक्‍शनचा "युटोपिया' (मिनी लवासा) हा मोठा गृहप्रकल्प राबविण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले मुख्य संशयित सूत्रधार महेश गोविंद नवाथे (वय 45, रा. मारुती मंदिर) यांना आज आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईत अटक केली. त्याच्याविरुद्ध 340 तक्रारी असून त्यांनी 14 कोटी 28 लाख 38 हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. यामध्ये चौदा संचालक असून त्यापैकी चौघा संशयितांना अटक केली आहे.

नवाथे याने रत्नागिरीमध्ये धामणसे आणि निवंडी येथे युटोपिया म्हणजे मिनी लवासाचा प्रकल्प राबविण्याची घोषणा केली. विविध प्रसारमाध्यमांद्वारे त्याची जाहिरात केली. रत्नागिरीबरोबर देश आणि परदेशातूनही यामध्ये गुंतवणूक झाली. विविध सुविधा आणि परतफेडीचे आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवल्याने अनेकांनी प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक केली. परंतु, गुंतवणूक करणाऱ्या लोकांना चार वर्षे झाली तरी गुंतवलेली रक्कम परत मिळाली नाही किंवा प्रकल्प ठिकाणी कोणतेच काम सुरू झालेले आढळले नाही. गुंतवणूकदारांनी वारंवार त्याच्या कार्यालयाशी संपर्क साधला; मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. कंपनीचे मुख्य प्रवर्तक किंवा कर्मचारी हजर राहत नसल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे याची तक्रार दाखल केली.

Web Title: one arrested for deceiving about housing