सिंधुदुर्गात पाठीवरचे ओझे आता होणार कमी...

One crore funds sanctioned sindudurg Z P school koakn marathi news
One crore funds sanctioned sindudurg Z P school koakn marathi news

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून मोठ्या पटसंख्येच्या १०० शाळांमध्ये लॉकरची सुविधा प्राधान्याने देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी आज शिक्षण समिती सभेत दिली.
जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात झाली. समिती सदस्य विष्णुदास कुबल, सरोज परब, संपदा देसाई, उन्नती धुरी, राजन मुळीक, सुनील म्हापणकर आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे 
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे. निधीतून १०० शाळामंध्ये (३६१ युनिट) लॉकर बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक युनिटमध्ये १५ लॉकर असणार आहेत. त्यासाठी प्राधान्याने मोठ्या पटसंख्येच्या १०० शाळांची निवड केली आहे. यामध्ये देवगडमध्ये १७, दोडामार्ग ३, कणकवली १७, कुडाळ २५, मालवण ३ शाळांचा समावेश आहे, अशी माहिती आंबोकर यांनी दिली.

१०० शाळांमध्ये मिळणार लॉकर
जिल्ह्यातील प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान व्हावे, प्राथमिक शाळांची कमी होत असलेली पटसंख्या थांबविण्यासाठी प्राथमिक शाळामध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू केले. त्याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण १३९५ प्राथमिक शाळांपैकी ३७६ शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले आहे. यामुळे ८२ शाळांमध्ये पूर्वीपेक्षा पटसंख्या वाढली आहे. यामध्ये सावंतवाडी ५१, दोडामार्ग ३, वेंगुर्ले ११, कणकवली १५, कुडाळ १२ मध्ये पटसंख्या वाढली आहे; मात्र सेमी इंग्रजी शिकविण्यासाठी शिक्षक अपुरे पडत असल्याने जिल्ह्यातील शिक्षकातून सेमी इंग्रजी शिकविण्यसाठी इच्छूक असलेल्या शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामध्ये ६९ शिक्षक सेमी इंग्रजी शिकवायला तयार असल्याचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहितीही आंबोकर यांनी दिली.

 ६९ शिक्षक सेमी इंग्रजी शिकविण्यास इच्छूक
चर्चेत सदस्य विष्णूदास कुबल यांनी जिल्ह्यात ३७६ शाळांमध्ये सेमी इंग्रजी शिकविले जाते आणि ६९ शिक्षक सेमी इंग्रजी शिकविण्यास इच्छूक आहेत. सध्यस्थितीत सेमी इंग्रजी शाळेत कोणते शिक्षक अध्यापन करीत आहेत, असा प्रश्‍न उपस्थित केला. सेमी इंग्रजी सुरू असलेल्या प्रत्येक शाळेत शिक्षक मिळाला पाहिजे, या दृष्टीने नियोजन व्हावे, अशी सूचना विष्णूदास कुबल यांनी केली. शहरी भागात किती व ग्रामीण भागात किती सेमी इंग्रजीच्या शाळा आहेत, याची माहिती पुढील सभेत सादर करावी. ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेत दर्जेदार सेमी इंग्रजी शिक्षण मिळावे, या दृष्टीने तेथील जास्तीत जास्त शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू व्हावे, या दृष्टीने नियोजन करा अशी सूचनाही लोके यांनी केले. 

५०० शाळांत स्काऊट गाईड
जिल्ह्यात स्काऊट गाईड युनिट असलेल्या २१७ शाळांची नोंदणी झाली आहे. किमान ५०० शाळांमध्ये स्काऊट गाईड युनिट स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, असे लोके यांनी सुचविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com