नावळेतील ग्रामस्थ देताहेत ‘एक दिवस गावासाठी’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

वैभववाडी - गावातील प्रत्येक ग्रामस्थाने गावासाठी एखादा दिवस दिला तर गावातील अनेक कामे मार्गी लागतील या संकल्पनेतून नावळे ग्रामस्थांनी ‘एक दिवस गावासाठी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. पहिल्याच दिवशी विहिरीतील गाळ उपसा आणि रस्त्यांची डागडुजी करीत या स्तुत्य उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

वैभववाडी - गावातील प्रत्येक ग्रामस्थाने गावासाठी एखादा दिवस दिला तर गावातील अनेक कामे मार्गी लागतील या संकल्पनेतून नावळे ग्रामस्थांनी ‘एक दिवस गावासाठी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. पहिल्याच दिवशी विहिरीतील गाळ उपसा आणि रस्त्यांची डागडुजी करीत या स्तुत्य उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

निव्वळ शासनाच्या योजना राबवून गावाचा विकास होत नाही तर गावच्या विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा असतो. ग्रामस्थांनी ठरविले तर कोणतेही काम चुटकीसरशी होऊ शकते. एवढेच नव्हे तर कोणते काम प्राधान्याने घ्यावे आणि कोणत्या हंगामात करावे याचे ज्ञान स्थानिकांनाच असते. परंतु लोकसहभागाची मानसिकता प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे आवश्‍यक असते. शासनाच्या विविध योजना राबवित असताना नावळे ग्रामस्थांनी एक दिवस गावासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ रविवारी (ता.१४) करण्यात आला. गावातील पन्नासहून अधिक ग्रामस्थ एकत्र आले. विशेष म्हणजे यामध्ये महिलांचा समावेश मोठा होता. पहिल्याच दिवशी भगवती मंदीर परिसरातील विहीरीतील गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आले. अवघ्या काही तासात या विहीरीतील गाळ काढुन ही विहीर पुर्णपणे स्वच्छ करण्यात आली. यानतंर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे काम सुरू किेले. या रस्त्याची डागडुजी सुध्दा तत्काळ करण्यात आली. मंदीर परिसरातील संरक्षक कठड्यांची दुरूस्तीदेखील यावेळी ग्रामस्थांनी केली.

एक दिवस गावासाठी या उपक्रमाच्या प्रारंभप्रसंगी नावळे सरपंच संभाजी रावराणे, उपसरपंच गिताजंली राणे, सदस्य गुरूनाथ राणे, विलास रावराणे, लक्ष्मण कदम, महेश रावराणे, विजय सांवत, रमेश गुरव, आप्पा पाटील, अकुंश घाडी, संतोष राणे, शांताराम गुरव, धोंडु गुरव, पांडुरंग रावराणे, अशोक रावराणे, श्रीपत सुतार आदी उपस्थित होते.

जनजागृतीवर भर
यापुढे महिन्यातून एक दिवस ग्रामस्थ एकत्र येऊन गावातील विविध कामे श्रमदानाच्या माध्यमातून करणार आहेत. भविष्यात वृक्षसंवर्धन, वृक्ष लागवड, जलसंधारण, स्वच्छता व जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे.

Web Title: one day for our village by navale people