टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

सावंतवाडी - सांगेली खळणेवाडी येथील काजू फॅक्टरीजवळ दुचाकी आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात एक कामगार जागीच ठार झाला, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे.

सावंतवाडी - सांगेली खळणेवाडी येथील काजू फॅक्टरीजवळ दुचाकी आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात एक कामगार जागीच ठार झाला, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना आज चार वाजण्याच्या सुमारास नवीन माडखोल, सांगेली रस्त्यावर घडली. आकाश मोहन (19) असे मृताचे नाव आहे, तर जखमी रामा नारायण नानूचे (२२ रा.बेळगाव) याला येथील रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले.

याबाबत पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. संबंधित दोघे कामगार हे बाजूच्या काजू फॅक्टरी कामाला आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one dead in an Accident in Sangeli Khalanewadi