महाडजवळ अपघातात एक ठार, तर एक जखमी

सुनील पाटकर
मंगळवार, 15 मे 2018

महाड (रायगड) : मुंबई गोवा महामार्गावर कांबळे गावाजवळ एका दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने (सोमवारी) रात्री अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला आहे. 

महाड (रायगड) : मुंबई गोवा महामार्गावर कांबळे गावाजवळ एका दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने (सोमवारी) रात्री अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला आहे. 

अमिर अहमद कोंडविलकर असे मृत तरुणाचे नाव आहे. अमिर व त्याचा मित्र नजिर फलनायक (म्हाप्रळ) हे दोघे नजिर याच्या दुचाकीवरुन पोलादपूरहून महाडकडे येत होते. या दरम्यान सत्य महासेल दुकाना समोर मुंबईकडून येणाऱया वाहनाने ओव्हरटेक करताना दुचाकीला जोरदार धडक दिली. यात अमिर कोंडविलकर हा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मरण पावला तर नजिर याचा उजवा पाय फँक्चर झाला आहे. या अपघाताची नोंद महाड एमआयडिसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 
 
Web Title: one dieed and one injured in an accident near mahad